जिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 16:04 IST2021-04-07T16:02:58+5:302021-04-07T16:04:21+5:30

CoronaVirus Zp Sataranews- सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. तर मुख्य दरवाजातूनच जाता-येता येणार असल्याने पर्यायी मार्ग बंद राहणार आहेत.

Admission to Zilla Parishad only after seeing the identity card ... | जिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश...

जिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश...

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश... कोरोनाचा परिणाम : आता मुख्य दरवाजाच उघडा, पर्यायी मार्ग बंद

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने जिल्हा परिषद प्रशासनानेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. तर मुख्य दरवाजातूनच जाता-येता येणार असल्याने पर्यायी मार्ग बंद राहणार आहेत.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून कोरोना कहर सुरू आहे. दररोज शेकडोच्या पटीत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत, तसेच नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या मुख्य व विस्तारित इमारतीत पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश करण्यासाठी मुख्य इमारतीचा एकच दरवाजा उघडा ठेवण्यात येणार आहे. इतर पर्यायी मार्ग बंद करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आवारात पदाधिकारी, सदस्य आणि शासकीय कर्मचारी सोडून इतरांच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्यांची तपासणीही करण्यात येणार आहे.

इ-टपाल प्रणालीचा वापर करावा...

  •  प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी शासकीय कार्यालयात लोकांना प्रवेश बंदी
  • कार्यालयात न येता इ - टपाल प्रणालीद्वारे अर्ज करावेत, तसेच माहिती मिळवावी.
  • यासाठी संबंधित विभागाने मेल आयडी व संपर्क क्रमांक देण्याची सूचना करण्यात आली आहे.
  • येणाऱ्या अर्जावर निश्चित वेळेत कार्यवाही करावी, तसेच त्याची माहिती संबंधितांना कळविण्याची जबाबदारी विभागावर राहणार आहे.

Web Title: Admission to Zilla Parishad only after seeing the identity card ...