साताऱ्यात आदित्य ठाकरेंचे शेतकऱ्यांचा आसूड देऊन जल्लोषी स्वागत, आनेवडी टोलनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी 

By नितीन काळेल | Updated: January 9, 2024 18:44 IST2024-01-09T18:43:17+5:302024-01-09T18:44:06+5:30

सातारा : शिवसेना ठाकरे गट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कोल्हापूर आणि सातारा दाैऱ्यावर आले असताना आनेवाडी टोलनाक्यावर शिवसैनिकांनी ...

Aditya Thackeray was welcomed in Satara by giving the farmers a hearty welcome | साताऱ्यात आदित्य ठाकरेंचे शेतकऱ्यांचा आसूड देऊन जल्लोषी स्वागत, आनेवडी टोलनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी 

साताऱ्यात आदित्य ठाकरेंचे शेतकऱ्यांचा आसूड देऊन जल्लोषी स्वागत, आनेवडी टोलनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी 

सातारा : शिवसेना ठाकरे गट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कोल्हापूर आणि सातारा दाैऱ्यावर आले असताना आनेवाडी टोलनाक्यावर शिवसैनिकांनी शेतकऱ्यांचा आसूड, पुष्पहार आणि सातारी कंदी पेढे जल्लोषी स्वागत केले. तसेच यादरम्यान फटाक्यांची जाेरदार आतषबाजीही करण्यात आली.

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते आदींसह शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. यादरम्यान काही क्षणच आदित्य ठाकरे थांबले. तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बातचित केली. त्यानंतर ते कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. 

स्वागताला युवा सेनेच पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अविनाश बलकवडे, जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, युवा सेना जिल्हाप्रमुख माऊली पिसाळ, उपजिल्हाप्रमुख अजित यादव, दत्ता नलावडे, प्रशांत शेळके, तालुकाप्रमुख सागर रायते, नितीन गोळे,  युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे, शहरप्रमुख शिवराज टोणपे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Aditya Thackeray was welcomed in Satara by giving the farmers a hearty welcome