फरांदवाडीतील अपघातात आदर्कीचा दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:07 IST2021-02-09T19:06:36+5:302021-02-09T19:07:26+5:30

Accident Satara- फलटण-सातारा रस्त्यावरील फरांदवाडी गावच्या हद्दीत कार व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदर्की बुद्रुकमधील दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Adarki's two-wheeler killed in Farandwadi accident | फरांदवाडीतील अपघातात आदर्कीचा दुचाकीस्वार ठार

 सातारा -फलटण रस्त्यावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. (छाया : नसीर शिकलगार)

ठळक मुद्देफरांदवाडीतील अपघातात आदर्कीचा दुचाकीस्वार ठार

फलटण : फलटण-सातारा रस्त्यावरील फरांदवाडी गावच्या हद्दीत कार व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदर्की बुद्रुकमधील दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या महितीनुसार, दि. ८ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फरांदवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण-सातारा रस्त्यावरील जगताप पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. सातारा बाजूकडून कार (एमएच, ४२. एए, ३२२२) येत होती. चालकाने बेदरकारपणे कार चालविली.

यादरम्यान, फलटणकडून सातारा बाजूकडे निघालेल्या दुचाकीला (एमएच, ११. सीए, ३४३२) जोरात धडक बसली. यामध्ये दुचाकीचालक सचिन जयवंत जाधव (वय ३०, रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण) हे गंभीर जखमी झाले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. ते भैरवनाथ मल्टिस्टेटमध्ये ते कर्मचारी होते.

याबाबत संतोष किसन शिंदे (रा. ठाकुरकी, नवामळा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Adarki's two-wheeler killed in Farandwadi accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.