आदर्की परिसरात ओढे-नाले कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST2021-06-21T04:25:24+5:302021-06-21T04:25:24+5:30
फलटण तालुक्याच्या ८४ गावांत दुष्काळी होता. त्यावेळेपासून धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी तालुक्यात येईपर्यंत कृषी विभाग, वनविभाग, लघु पाटबंधारे विभागाने शेकडो ...

आदर्की परिसरात ओढे-नाले कोरडेच
फलटण तालुक्याच्या ८४ गावांत दुष्काळी होता. त्यावेळेपासून धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी तालुक्यात येईपर्यंत कृषी विभाग, वनविभाग, लघु पाटबंधारे विभागाने शेकडो पाझर तलाव, सिमेंट बंधारे, माती बंधारे कोट्यवधी रुपये खर्चुन बांधले होते. पाणी आडवा पाणी जिरवा कार्यक्रम यशस्वी केला. पण धोम -बलकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून दोन आवर्तने व नैसगिक चार महिने पावसाचे पाणी वाहून पूर परिस्थिती निर्माण होते. सर्व पाणी साठे भरून पाणी निरा नदीला मिळते. पण बहुतांशी पाणी साठे महिन्याभरात मोकळे होतात.
यावर्षी मे महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर जून महिना अर्धा कोरडा गेला. तोपर्यंत पाणी साठे शेवटचे घटका मोजून ओढे-नाले कोरडे पडले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होऊन नद्यांना पूर आले. धरणातून पाणी सोडले पण फलटण तालुक्यात रिमझिम पावसावर समाधान मानावे लागले. ओढे-नाले कोरडे पडले आहेत तर पाणी साठे शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
फलटण तालुक्यात पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. आता रिमझिम पावसाने जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पेरण्या होणार आहेत
फोटो
फलटण तालुक्यातील आदर्की परिसरातील सिमेंट बंधारे कोरडे पडले आहेत. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)