शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी युवकाला अटक, कऱ्हाड बसस्थानकात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 1:52 PM

कऱ्हाड येथील बसस्थानक परिसरातून बुधवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाने एका युवकास अटक केली. तसेच त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. सागर सदाशिव नलावडे (वय २०, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कऱ्हाड ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देपिस्तूल बाळगल्याप्रकरणी युवकाला अटक, कऱ्हाड बसस्थानकात कारवाई पोलिसांनी हटकताच पळून जाण्याचा प्रयत्न

कऱ्हाड : येथील बसस्थानक परिसरातून बुधवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाने एका युवकास अटक केली. तसेच त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. सागर सदाशिव नलावडे (वय २०, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कऱ्हाड ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.कऱ्हाड शहरात एक युवक विनापरवाना पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर बसस्थानक परिसरात एक युवक संशयितरीत्या फिरत असल्याचा पथकातील पोलिसांना आढळून आला.

या ठिकाणी पथकातील पोलिसांनी त्याला हटकताच तो पळून जाऊ लागला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी संबंधित युवकास पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासणी केली असता पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी त्या युवकाकडे नाव, गाव, पत्ता अशी विचारपूस केली असता त्याने सागर नलावडे असे नाव सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला व पिस्तूल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताला कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे