पिस्तूल बाळगल्याप्रकरणी युवकाला अटक, कऱ्हाड बसस्थानकात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 13:54 IST2018-10-11T13:52:57+5:302018-10-11T13:54:02+5:30
कऱ्हाड येथील बसस्थानक परिसरातून बुधवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाने एका युवकास अटक केली. तसेच त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. सागर सदाशिव नलावडे (वय २०, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कऱ्हाड ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी युवकाला अटक, कऱ्हाड बसस्थानकात कारवाई
कऱ्हाड : येथील बसस्थानक परिसरातून बुधवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाने एका युवकास अटक केली. तसेच त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. सागर सदाशिव नलावडे (वय २०, रा. देशमुखमळा, पार्ले ता. कऱ्हाड ) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
कऱ्हाड शहरात एक युवक विनापरवाना पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पथकाच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर बसस्थानक परिसरात एक युवक संशयितरीत्या फिरत असल्याचा पथकातील पोलिसांना आढळून आला.
या ठिकाणी पथकातील पोलिसांनी त्याला हटकताच तो पळून जाऊ लागला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी संबंधित युवकास पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासणी केली असता पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी त्या युवकाकडे नाव, गाव, पत्ता अशी विचारपूस केली असता त्याने सागर नलावडे असे नाव सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला व पिस्तूल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताला कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक केली.