शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

सुरूरजवळ दोन वाहनांमध्ये अपघातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:43 IST

वेळे : आशियाई महामार्गावर सुरुर, (ता. वाई) या गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हॉटेल पार्क इनसमोर दोन ...

वेळे : आशियाई महामार्गावर सुरुर, (ता. वाई) या गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हॉटेल पार्क इनसमोर दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला, तर लहान बाळासह तिघे बचावले आहेत.

अपघातग्रस्त दोन्ही वाहने सातारा बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात होती. दोन्हीही वाहनांचा वेग जास्त होता. दोन्हीही वाहने रस्त्यावरून समांतर जात होती. अचानक कार (क्र. एमएच १४ बीआर ७८९८)वरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती कार (क्र. एमएच ०३ डीके ०६३६)ला आडवी झाली. त्यामुळे अपघात झाला. जबर धडक बसल्याने कार (क्र. एमएच ०३ डीके ०६३६) दुभाजक ओलांडून पलीकडच्या रस्त्यावर गेली, तर कार (एमएच १४ बीआर ७८९८)ने दोन पलट्या घेऊन रस्ता दुभाजकात पलटी झाली. ही कार दहा फूट उंच उडून रस्त्यावर आपटली. या कारचा एक टायर पूर्ण निखळला गेला.

अपघात ठिकाणाहून अंदाजे १०० फूट लांब अंतरावर ही दोन्ही वाहने फरफटत गेली. यापैकी एका वाहनात फक्त चालक होता, तर दुसऱ्या वाहनात पती, पत्नी व चार महिन्यांची चिमुकली होती. यापैकी महिलेला किरकोळ स्वरूपाची जखम झाली. सुदैवाने इतर सर्व जण सुखरूप बचावले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.