VIDEO: मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेली मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 18:05 IST2019-08-16T18:04:30+5:302019-08-16T18:05:29+5:30
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या वस्तू पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणार होत्या

VIDEO: मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेली मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात
कराड - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निघालेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या ट्रकला कराडनजीक भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
पूरग्रस्तांना मदत म्हणून कलाकार मंडळींनी जीवानावश्यक वस्तू गोळा केल्या होत्या. पुण्यातून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या वस्तू पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणार होत्या. आज दुपारी पुण्यावरुन हा ट्रक कोल्हापुरच्या दिशेने रवाना झाला. मात्र पुणे-बंगळुरु हायवेवर कराड जवळ या ट्रकने समोरील कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघाताबाबत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितले की, पूरग्रस्तांना मदतीसाठी घेऊन चाललेल्या एका ट्रकचा कराडजवळ अपघात झाला. यात जीवितहानी झाली नाही. ड्रायव्हरही सुखरुप आहे. कोणीही घाबरण्याचे कारण नाही आणि कोणत्याही अफवा पसरवू नका असं आवाहन त्यांनी केलं. तसेच दुसरा ट्रक उपलब्ध करुन यातील सामान घेऊन आम्ही कोल्हापूरच्या दिशेने रवाना होऊ असं त्यांनी सांगितले.