मायणी दहिवडी मार्गावर अपघात! चार जण ठार, सहा जण जखमी; धोंडेवाडी नजीक घटना
By दीपक शिंदे | Updated: August 10, 2023 09:16 IST2023-08-10T09:15:13+5:302023-08-10T09:16:51+5:30
मायणी दहिवडी मार्गावरील धोंडेवाडी ता. खटाव गावानजीक ओमनी गाडीचा अपघात होऊन चार जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत.

मायणी दहिवडी मार्गावर अपघात! चार जण ठार, सहा जण जखमी; धोंडेवाडी नजीक घटना
मायणी : मायणी दहिवडी मार्गावरील धोंडेवाडी ता. खटाव गावानजीक ओमनी गाडीचा अपघात होऊन चार जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर वडूज येथे उपचार सुरू असल्याची माहिती घटनास्थळ व पोलिसांकडून मिळाली आहे.
सिद्धेश्वर कुरवली व बनपुरी तालुका खटाव येथील १० जण बाळूमामा (आदमापूर) या ठिकाणी देवदर्शनाला निघाले होते. साडेसहाच्या दरम्यान धोंडेवाडी तालुका खटाव गावानजीक ओमनी चा अपघात झाला. या अपघातामध्ये गाडीत असलेल्या दहा जणांपैकी तीन जण जागीच ठार झाले तर एक जण उपचारादरम्यान मृत्यू पडला तसेच सहापैकी एक जण अजून गंभीर असून पाच जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या सर्वांवर वडूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.