रेल्वेचे साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 20:58 IST2021-06-14T20:54:24+5:302021-06-14T20:58:51+5:30
Accident Satara : मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. पुणे-बंगलोर आशियायी महामार्गावर वहागाव (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असलेल्या कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वहागावच्या हद्दीत उलटल्यामुळे साहित्य उपमार्गावर विस्कटले होते. (छाया : माणिक डोंगरे)
मलकापूर : मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटला. पुणे-बंगलोर आशियायी महामार्गावर वहागाव (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत रविवारी हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक मुलराज (वय ४५ रा. जम्मू काश्मीर) हा कंटेनर (केए ०१ एजे ४१८०) मधून मुंबईवरून रेल्वेचे सुटे पार्ट भरून कर्नाटक धारवाड येथे जात होता. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने महामार्गाकडेला असलेल्या नाल्यात उलटला.
कंटेनरमधील साहित्य उपमार्गावर पडल्यामुळे उपमार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सदाशिव सकट, तानाजी नामदास यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना मदत केली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.