साताऱ्यातून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:46 IST2019-09-16T12:46:00+5:302019-09-16T12:46:49+5:30

सातारा येथील रिमांड होममधील दोन अल्पवयीन मुलांचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी विजय वसंत सपकाळ (रा.बोरखळ, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Abduction of two minors from Satara | साताऱ्यातून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

साताऱ्यातून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

ठळक मुद्देसाताऱ्यातून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरणशहर पोलीस ठाण्यात अपहरण केल्याची तक्रार

सातारा : येथील रिमांड होममधील दोन अल्पवयीन मुलांचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी विजय वसंत सपकाळ (रा.बोरखळ, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ रोजी दुपारी दीड ते साडेसहाच्या सुमारास दोन मुले रिमांडहोममध्ये नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रिमांडहोम प्रशासनाने मुलांचा शोध घेतला. मात्र, मुले कुठेही सापडली नाहीत. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञाताने मुलांचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिमांडहोमधून चार मुले अचानक गायब झाली होती. यातील दोन मुलांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने रिमांडहोममध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ही मुले स्वत:हून निघून गेली आहेत का? याची पोलीस चौकशी करत आहेत.

Web Title: Abduction of two minors from Satara