शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: मांड ओढ्यावरील पुलावरुन वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 12:35 IST

शिरवळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून साकव पूल पाण्याखाली गेला होता.

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील मांड ओढ्यावरील पुलावरुन एक युवक दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. अविनाश उर्फ पप्पू शिवाजी जगताप (वय २७, रा.केदारेश्वर काँलनी, शिरवळ ता.खंडाळा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना काल, मंगळवारी (दि.१८) राञीच्या दरम्यान घडली. आज, दुपारच्या सुमारास निरा नदीच्या पात्रालगत मंडाई कॉलनी जवळ मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानाना अविनाशचा मृतदेह सापडला.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, अविनाश उर्फ पप्पू जगताप हा दुचाकीवरुन काही कामानिमित्त शिरवळ येथील सटवाई कॉलनी याठिकाणी निघाला होता. दरम्यान, शिरवळ परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून साकव पूल पाण्याखाली गेला होता. अविनाशला अंधार असल्याने व पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह तो पुलावरुन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.याबाबतची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक युवकांच्या व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्यातून शोधकार्य राबविले. अंधार असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावेळी शोधकार्य उशिरा थांबविण्यात आली.

दरम्यान, आज, सकाळी पुन्हा शिरवळ पोलिसांकडून महाबळेश्वर ट्रेकर्स, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, स्थानिक मच्छिमार, शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्यातून शोधमोहिम सुरु करण्यात आली. दुपारच्या सुमारास निरा नदीच्या पात्रालगत मंडाई कॉलनी जवळ मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांना अविनाशचा मृतदेह हाती लागला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस