शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा साताऱ्यात कोयत्याने वार करून तरूणाचा खून, गँगवारमधून हा प्रकार घडल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:18 IST

आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना; पाठीमागून येऊन अचानक हल्ला

सातारा : साताऱ्यातील करंजे पेठेतील आंदेकर चौकात वृषभ राजेंद्र जाधव (वय २८, रा. रविवार पेठ, सातारा) या तरुणाचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. गँगवारमधून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वृषभ जाधव हा गुुरुवारी दुपारी घरीच होता. त्याला कोणाचा तरी फोन आला. तो तातडीने दुचाकीवरून करंजे पेठेतील आंदेकर चाैकात गेला. तेथे गेल्यानंतर तो फोनवर बोलत असतानाच पाठीमागून आलेल्या चाैघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. तो जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या पायावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून ट्रीपल सीट मंगळवार पेठेत नेण्यात आले. त्या ठिकाणी आणखी काही तरुण आले. त्या तरुणांनीही त्याला बेदम मारहाण केली. या प्रकाराची माहिती त्याच्या मित्रांना समजल्यानंतर रुग्णवाहिकेतून ऋषभला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर साताऱ्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. खासगी रुग्णालयासमोर जमाव मोठ्या संख्येने जमला.त्यानंतर शाहूपुरी, सातारा शहर पोलिसांची कुमक त्या ठिकाणी पोहोचली. ऋषभ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. तेथेही तरुणांनी मोठी गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सिव्हीलसमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली होती.

आरोपींचे मोबाइल स्वीच ऑफऋषभ जाधव याचा खून केल्यानंतर आरोपींनी पलायन केले. त्याचा खून कोणी केला, त्यांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या टीम विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. आरोपींनी त्यांचे मोबाइल बंद ठेवले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही शक्यताही पोलिस पडताळताहेततरुणांच्या दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वारंवार वाद होत होते. काही वर्षांपूर्वी राजवाडा येथे आप्पा मांढरे यांच्यावर गोळीबार झाला होता. त्या प्रकरणात काही तरुणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातून तर हे गँगवार उफाळून आला नसेल ना, याची शक्यताही पोलिस पडताळून पाहात आहेत.

पोलिस मुख्यालयासमोर तणावआरोपींना तातडीने अटक करा, या मागणीसाठी गुरुवारी रात्री पावणेआठ वाजता मोठ्या संख्येने जमाव पोलिस मुख्यालयाजवळ आला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना भेटून आरोपींना तत्काळ अटक करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने घेतली. परंतु अधीक्षक दोशी यांनी पोलिसांची पथके आरोपींना अटक करण्यासाठी रवाना झाली आहेत. लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Youth Murdered in Broad Daylight; Gang War Suspected

Web Summary : A 28-year-old was brutally murdered in Satara with a sickle. Police suspect gang rivalry as the motive. The victim was attacked by multiple assailants and succumbed to injuries in hospital, sparking tension and protests.