शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Satara: जेवण न बनविल्याच्या रागातून महिलेचा खून, ऊसतोड मजुराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 18:10 IST

महिलेला दांडक्याने केली मारहाण

कऱ्हाड : जेवण बनविले नसल्याच्या कारणावरून महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करीत तिचा खून करण्यात आला. रेठरे खुर्द, ता.कऱ्हाड येथे वाठार ते रेठरे जाणाऱ्या मार्गालगत मोहिते मळा नावच्या शिवारात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे.सिंधू जाधव (वय ६५, रा.डोंगरसुनी-सावळज, ता.तासगाव, जि.सांगली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ऊसतोड कामगार विठ्ठल ज्ञानदेव चौगुले (वय ५२, रा.शिरशी, ता.सांगोला, जि.सोलापूर) याला अटक करण्यात आले आहे.रेठरे खुर्द येथील जगन्नाथ बापू मोहिते यांचे जनावरांचे शेड वाठार ते रेठरे जाणाऱ्या मार्गालगतच्या मोहिते मळा नावच्या शिवारात आहे. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काही शेतकरी या शिवारात गेले असता, जगन्नाथ मोहिते यांच्या शेडनजीक सिंधू जाधव ही महिला नग्नावस्थेत मृत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, सिंधू जाधव हिच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा दिसत होत्या.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, जगन्नाथ मोहिते यांच्या शेडजवळ सिंधू जाधव ही महिला ऊसतोड मजूर विठ्ठल चौगुले याच्यासह झोपडीत राहण्यास होती, असे निष्पन्न झाले. संशय आल्यामुळे पोलिसांनी विठ्ठल चौगुले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, शुक्रवारी दि. १ रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण बनवले नाही, या कारणावरून सिंधू जाधव हिला मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या मारहाणीत सिंधू जाधव हिचा मृत्यू झाल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले आहे. पोलिस उपनिरीक्षक अब्दुलहदी बिद्री तपास करीत आहेत.डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू..

विठ्ठल चौगुले याने लाकडी दांडक्याने सिंधू जाधव हिच्या डोक्यात, पायावर, तसेच हातावर मारहाण केली. तिला झोपडीतून बाहेर ओढले, तसेच कपडे काढून जमिनीवर ढकलून दिले, असे पोलिस तपासातून उघडकीस आले आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला असता, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे सिंधू जाधव हिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल पोलिसांना दिला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस