माणिक डोंगरेमलकापूर : आगाशिवनगरातील पहाटेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेने श्रीराम कॉलनी परिसर सुन्न झाला. एका महिलेने कुऱ्हाडीने वार करून प्रियकराचा आधी खून केला. त्यानंतर डायल ११२ वर फोन करून मदत हवीय, असे पोलिसांना सागितले; पण जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पुरुषाचा मृतदेह दिसला. मात्र, काही मिनिटांतच या घटनेचे सारे चित्र समोर आले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!कराड शहर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल पथक रात्रगस्तीत मग्न असताना पहाटे ०३:३१ वाजता डायल ११२ वर एका महिलेने काॅल केला. ‘हॅलो, मला मदत हवी आहे. लवकर या.’ हा काॅल ऐकून पोलिसही खडबडून जागे झाले. इतक्या रात्री नेमके काय घडले, असेल असा विचार करीत पोलिस आगाशिवनगरात पोहोचले.ज्या महिलेने काॅल केला होता त्या महिलेच्या हातात कुऱ्हाड होती, तर समोरच पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना दिसला. नेमका काय प्रकार घडला असेल, याचा पोलिसांनी चटकन अंदाज बांधला. त्याच महिलेकडे विचारपूस केल्यानंतर तिने राजेंद्र मरीआप्पा काळे (रा. कराड) याचा खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह रुग्णालयात नेला.पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित महिला सारिका कोळी हिने राजेंद्र काळे याच्यासोबत पूर्वी प्रेमसंबंध असल्याचेही सांगितले. तो वारंवार संशय घेत भांडण करीत असल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. घटनेच्या रात्री उशिरा दोघांत वाद झाला आणि पहाटे पुन्हा मारहाण सुरू झाल्याने संतापाच्या भरात तिने घरातील कुऱ्हाडीने मानेवर व चेहऱ्यावर वार केल्याची कबुलीही दिली.
आई कारागृहात; लहान मुलीचे काय?संशयित महिलेला एक लहान मुलगी आहे. तिची आई आता कारागृहात गेली. त्यामुळे त्या मुलीच्या भविष्याचे काय, असा प्रश्न पोलिसांसह सगळ्यांनाच पडला आहे.
Web Summary : In Agashivnagar, a woman murdered her lover with an axe after a fight. She then called the police for help, confessing to the crime. The woman is in custody; the future of her young daughter is uncertain.
Web Summary : आगाशिवनगर में, एक महिला ने झगड़े के बाद कुल्हाड़ी से अपने प्रेमी की हत्या कर दी। फिर उसने पुलिस को मदद के लिए बुलाया और अपराध कबूल कर लिया। महिला हिरासत में है; उसकी छोटी बेटी का भविष्य अनिश्चित है।