भरधाव कारने कोलवडीत दहा वर्षाच्या मुलीला उडविले, जागीच ठार, अन्य दोघाना धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 10:17 IST2024-10-08T10:17:20+5:302024-10-08T10:17:52+5:30
कोरेगाव तालुक्यात हिट अँड रन चा प्रकार; कारमधील युवकांचा पोबारा

भरधाव कारने कोलवडीत दहा वर्षाच्या मुलीला उडविले, जागीच ठार, अन्य दोघाना धडक
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात सातारा रोड पळशी दरम्यान कोलवडी गावात खंडाळा शिरूर राज्यमार्गावर सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हिट अँड रन चा प्रकार घडला आहे.
भरधाव वेगातील कारने दहा वर्षाच्या मुलीला ठोकर दिली, ती जागीच ठार झाली. रस्त्यावरील अन्य दोघांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. कार सोडून कारमधील मुले पळून गेली आहेत. कोलवडीतील युवक मोठ्या प्रमाणावर सातारा रोड पोलीस दुरक्षेत्रासमोर जमले आहेत. तर पोलीस अधिकारी समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत.