Satara: महाबळेश्वरमध्ये आढळले दुर्मीळ प्रजातीचे वटवाघुळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:46 IST2024-12-23T15:45:25+5:302024-12-23T15:46:37+5:30
महाबळेश्वर (जि.सातारा) : महाबळेश्वर येथे वटवाघळाची एक दुर्मीळ प्रजाती आढळली असून, या प्रजातीस ‘पेंटेड बॅट’ या नावाने ओळखले जाते. ...

Satara: महाबळेश्वरमध्ये आढळले दुर्मीळ प्रजातीचे वटवाघुळ!
महाबळेश्वर (जि.सातारा) : महाबळेश्वर येथे वटवाघळाची एक दुर्मीळ प्रजाती आढळली असून, या प्रजातीस ‘पेंटेड बॅट’ या नावाने ओळखले जाते. नारंगी रंग पंखावरती काळे त्रिकोणी पट्टे शरीराची लांबी ३ ते ५ सेंमीपर्यंत असू शकते, त्याला ३८ दात, तर ५० ग्रॅम वजन असणारे हे वटवाघुळाचा वावर केळाची झाडे गुहा, सुकी वने झोपड्यांच्या कोपऱ्यावर अशा भागात आढळतो, तर छोटे किडे हे त्याचे प्रमुख अन्न आहे, या वटवाघळाची जोडी एकावेळी एकच पिल्लाचा सांभाळ करू शकते, ही वटवाघळे ५ ते ६ च्या समूहाने राहतात.
महाबळेश्वर येथील बराचसा परिसर जंगलांनी, दऱ्या-खोऱ्यांनी व्यापला असून बराच खडकाळ भागही आहे. येथील तापोळा भाग तसेच महाबळेश्वर शहरानजीक असणाऱ्या खडकाळ भागातील गुहांमध्ये तसेच शहरी भागातही विविध वटवाघळांच्या प्रजाती पाहावयास मिळतात. शनिवारी महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या सरफराज शेख यांच्या घरात हे दुर्मीळ वटवाघुळ आढळले, हे वटवाघुळ व त्याचा रंग पाहता सरफराज यांनी हे वटवाघुळ बरणीच्या साह्याने पकडून त्यांनी ते वटवाघुळ येथील वनविभागाच्या कार्यालयामध्ये नेऊन दिले. वन कर्मचाऱ्यांनी या दुर्मीळ वटवाघळास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.