शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ येथे विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत संपवले जीवन; पती, सासू, पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 19:36 IST

मुराद पटेल  शिरवळ : शिरवळ ता. खंडाळा येथील सटवाई कॉलनीतील विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. मोमीना शाहरुख ...

मुराद पटेल शिरवळ : शिरवळ ता. खंडाळा येथील सटवाई कॉलनीतील विवाहितेने घरातच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. मोमीना शाहरुख पठाण (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त तसेच हुंड्याकरिता जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू व पतीचा मित्र या तिघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे येथील मोमीना शेख हिचा विवाह शिरवळ येथील शाहरुख पठाण याच्याबरोबर २०२० रोजी झाला होता. मोमीनाला पती शाहरुख, सासू सलीमा उर्फ अमीना इस्माईल पठाण हे दोघे स्वयंपाक व इतर कारणावरून सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होते. शाहरुख हा काहीही काम करत नसल्याने विनाकारण मारहाण करीत सतत दारू व गांजा पिऊन आल्यावर काहीएक कारण नसताना मारहाण करत येथे राहायचे असेल तर वडिलांकडून पैसे घेऊन ये असे म्हणत. दरम्यान, मित्राच्या सांगण्यावरुन पती शाहरुखने मोमीनावर संशय घेत सतत मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे तिने घरातच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पती शाहरुख ईस्माईल पठाण, सासू सलिमा उर्फ अमिना ईस्माईल पठाण, मिञ सोन्या पंडित यांच्याविरुध्द वडील करीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहरुख पठाण, सोन्या पंडित यांना अटक करीत खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे हे अधिक तपास करीत आहेत

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस