शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

By दीपक शिंदे | Updated: March 7, 2024 16:13 IST

ऐनवेळी काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार

दीपक शिंदेसातारा : महायुतीतील इच्छुकांची वाढलेली संख्या आणि महाआघाडीतील फूट यामुळे कोणत्या पक्षाने सातारा लोकसभा मतदारसंघ घ्यायचा अन् कोणी सोडायचा याचाच गोंधळ सुरू आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीसाठी शड्डू ठोकलेला असला तरी मैदानात उतरताना त्यांना भाजपऐवजी मित्रपक्षाचा आधार तर घ्यावा लागणार नाही ना अशी स्थिती आहे. कारण महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाने साताऱ्याची मागणी केली आहे. तर महाआघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे विद्यमान खासदारकी असल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होण्याची शक्यता अधिक आहे.  सातारा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला मतदारसंघ. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाची जिल्ह्यातील ताकदही दुभंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट झाल्याने आपली ताकद आजमाविण्याचा ते नक्कीच प्रयत्न करणार. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून संपूर्ण जिल्हा शरद पवारांसोबत गेली अनेक वर्षे राहिला. याच जिल्ह्याने त्यांना नव्या उभारीची ताकद दिली.पावसातील सभेने राज्याचे राजकारण बदलले. त्यामुळे याच जिल्ह्यात त्यांना पराभूत करून शरद पवार यांना शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार आहे. त्यासाठी भाजपने जिल्ह्यात आपली ताकद वाढलेली असली तरी हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडावा, अशी रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. आपल्याच पुतण्याकडून बालेकिल्ल्यातच मात देण्याचा भाजपचा डाव दिसतो आहे. राज्यसभेपेक्षा लोकसभेत आपल्याला संधी मिळावी, अशी खासदार उदयनराजे भोसले यांची तीव्र इच्छा आहे. पण, भाजपने याबाबत अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. युतीच्या पातळीवर चर्चा सुरू असून चर्चेनंतरच निर्णय होईल, असे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आहे.  अजित पवार यांच्याकडे लोकसभेसाठी नितीन पाटील यांच्यासारखा सर्वमान्य उमेदवार आहे. मात्र, ऐनवेळी काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, त्यांचे चिरंजीव सारंग पाटील,  सुनील माने आणि सत्यजितसिंह पाटणकर यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. पण, महाआघाडीची ताकद कशी लागणार यावर त्यांच्या उमेदवारांची जुळणी आणि विजयाचा मार्ग निश्चित होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय कधी भाजप, कधी शिवसेना (शिंदे गट), तर कधी काँग्रेसही सातारा मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी जाता-जाता मागणी करताना पाहायला मिळतात. पण, खरा दावा हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच महायुती आणि महाआघाडीतील पक्षांची तिथे फार काही डाळ शिजणार नाही, असे दिसते. 

  • ५०,००० सर्वाधिक मताधिक्य श्रीनिवास पाटील यांना कऱ्हाडमधून. 
  • विधानसभेच्या कऱ्हाड उत्तर मतदार संघातून सर्वाधिक तर कविधानसभा मतदारसंघातून सर्वात कमी मताधिक्य मिळाले. 

२०१९ च्या निवडणुकीतील महत्त्वाचे फॅक्टर 

  • खासदार उदयनराजे भोसले यांनी सहा महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. 
  • भाजपमध्ये प्रवेश केल्याचा त्यांना फटका बसला आणि पराभव स्वीकारावा लागला. 
  • राष्ट्रवादीची एकसंध ताकद खासदार श्रीनिवास पाटील यांना उपयोगी पडली. 
  • पक्षाच्या आमदारांनी केलेली मदत महत्त्वाची ठरली. 

असा झाला बदल २०१९

  • ०७%  पोटनिवडणुकीत मतदारसंख्या वाढली 
  • सर्वसाधारण निवडणुकीत ११ लाख १७ हजार ७५७ मतदारांनी केले मतदान
  • पोटनिवडणुकीत १२ लाख ४९ हजार १५१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क 

 ८७७१७ गत पोटनिवडणुकीत खासदार श्रीनिवास पाटील यांना मिळालेले मताधिक्य

मतदारसंघ      पुरुष        स्त्री             एकूण वाई                  १६९५९९  १६७७३०    ३३७३३४ कोरेगाव           १५८०३५   १५१७९०    ३०९८२७ कऱ्हाड उत्तर    १४९७६५  १४३३८२    २९३१५४ कऱ्हाड दक्षिण  १५२५८७  १४५६९१    २९८३०३ पाटण               १५१४८०    १४६०९१    २९७५७१ सातारा             १६७१०१    १६४८४८    ३३१९७७ एकूण               ९४८५६७   ९१९५३२    १८६८१६६

आमदार किती कुणाचे काँग्रेस - ०१राष्ट्रवादी अजित पवार गट - ०१राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - ०२ शिवसेना शिंदे गट- ०२भाजप  - ०१

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBJPभाजपा