शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक, पुण्याचा दुचाकीस्वार ठार; हेल्मेटची काच डोक्यात घुसली

By दत्ता यादव | Updated: March 20, 2023 14:20 IST

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे हँडल, चाक तुटले

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत रस्त्याच्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पुण्याच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गिरीश कृष्णा नायडू (वय ४०, रा. सिटी लेन, खराडी पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.  हा अपघात काल, रविवारी (दि. १९) झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गिरीश नायडू हे पुण्याहून पाचगणीला निघाले होते. त्यावेळी वेळे येथे रस्त्याच्याकडेला नादुरुस्त कंटेनर उभा होता. या कंटेनरला गिरीश नायडू यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, नायडू यांच्या दुचाकीचे हँडल, चाक तुटले. अपघातावेळी त्यांच्या डोक्यात हेल्मेट होते. मात्र, याच हेल्मेटची काच डोक्यात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर भुईंज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नायडू यांना दवाखान्यात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. 

या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून, हवालदार तोरडमल हे अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यू