शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगार बनला फसवणुकीत ‘सफाईदार’!, साताऱ्यातील बोलघेवड्या पप्पूचे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:28 IST

फसविण्यासाठी मंत्रालयाचे नाव..

सातारा : त्याचा स्वभाव बोलघेवडा. ना ओळख ना पाळख. तरीही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली कशी ओळख आहे, याच्या फुशारक्या मारण्याच्या स्वभावामुळे अनेकजण त्याच्या गळाला लागले. स्वत:च्या करिअरचा ठावठिकाणा नसताना दुसऱ्यांना शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यानं अनेकांना गंडा घातला. एकदा कारागृहात जाऊन आल्यानंतर यात तो माहीर झाला. आता दुसऱ्यांदा तो कारागृहात गेलाय.सातारा तालुक्यातील महामार्गाला लागून बोरगाव हे गाव. या गावामध्ये ३५ वर्षांचा विवाहित तरुण राजेश ऊर्फ पप्पू नंदकुमार शिंदे हा राहतो. काही वर्षांपूर्वी हा पप्पू जिल्हा शासकीय रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत होता. पुढे हाच कामगार फसवणुकीत अगदी सफाईदार बनला. स्वभाव त्याचा बोलघेवडा असल्यामुळे त्याची चटकन कोणाशीही ओळख व्हायची. त्यातून नर्स, डाॅक्टरांचाही त्याचा चांगला संपर्क असायचा; मात्र त्याचे सिव्हिलमधील काम सुटल्यानंतर तो मोकाट सुटला. हाताला कामधंदा नसताना त्याने लोकांना गंडा घालण्याचा कामधंदा सुरू केला. मंत्रालयात माझी चांगली ओळख आहे. आरोग्य विभागात नोकरी लावू शकतो, असे त्याने अनेकांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून काही जणांनी त्याला लाखो रुपये दिले. लोक पैसे देताहेत, हे त्याला समजल्यानंतर त्याने अशाप्रकारचे लोक शोधण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर त्याचा कारनामा पहिल्यांदा समोर आला. काही वर्षांपूर्वी त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाली होती; परंतु काही दिवसांतच तो जामिनावर सुटून बाहेर आला; मात्र पुन्हा त्याने हाच उद्योग सुरू ठेवला. एका महिला नर्सला त्याने लाखो रुपयांना गंडा घातल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला सध्या अटक केली आहे. त्याने कोणाकोणाला गंडा घातलाय, याची त्याच्याकडून पोलिस माहिती घेताहेत; पण नागरिकांनीही स्वत:हून पुढे येऊन फसवणूक झाली असेल तर तक्रार देणे गरजेचे आहे, असे पोलिस सांगताहेत.

फसविण्यासाठी मंत्रालयाचे नाव..मंत्रालयात पप्पू शिंदेची कुठेही ओळख नाही. केवळ लोकांना फसविण्यासाठी त्याने मंत्रालयाचे नाव सांगितले. जे लोक त्याला पैसे परत मागायचे. त्यांचे पैसे थोडे-थोडे करून तो परत द्यायचा. लोकांची आक्रमकता पाहून तो वागायचा. त्यानंतर दुसरे गिऱ्हाईक शोधायचा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस