साताऱ्यात बेकायदेशीररित्या तलवार घेऊन फिरणाऱ्याच्या हातात बेड्या
By नितीन काळेल | Updated: December 15, 2023 17:30 IST2023-12-15T17:29:53+5:302023-12-15T17:30:17+5:30
सातारा : सातारा शहरात बेकायदेशीररित्या तलवार घेऊन फिरण्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला ...

साताऱ्यात बेकायदेशीररित्या तलवार घेऊन फिरणाऱ्याच्या हातात बेड्या
सातारा : सातारा शहरात बेकायदेशीररित्या तलवार घेऊन फिरण्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास शहरातील गोडोलीच्या गोळीबार मैदान परिसरात विजय सखाराम यादव (रा. गोडोली, सातारा. मूळ रा. कोंडवे, ता. सातारा) हा बेकायदेशिररित्या लोखंडी मूठ असलेली तलावर घेऊन फिरत असल्याचे दिसून आले.
याप्रकरणी हवालदार सचिन रिटे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विजय यादव याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस फाैजदार दिघे हे तपास करीत आहेत.