शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मतदानावेळी प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटल्या, चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 11:58 IST

कऱ्हाड : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या प्रचारार्थ चिठ्ठ्या वाटणाऱ्या चौघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

कऱ्हाड : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या प्रचारार्थ चिठ्ठ्या वाटणाऱ्या चौघांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधितांकडून प्रचाराच्या चिठ्ठ्याही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिस हवालदार प्रवीण बाळकृष्ण काटवटे आणि मंडल अधिकारी विलास अंतू थोरात यांनी फिर्यादी दिल्या आहेत.हवालदार प्रवीण काटवटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुहास रामचंद्र पाटील, धनाजी सदाशिव पाटील आणि अक्षय राजेंद्र पाटील (तिघेही, रा. उंडाळे) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, उंडाळे येथील मतदान केंद्रावर हवालदार प्रवीण काटवटे हे कर्तव्य बजावत असताना केंद्राबाहेर संबंधित तिघेजण उमेदवाराच्या प्रचारार्थ मतदारांना चिठ्ठ्या वाटत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हवालदार काटवटे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्या तिघांकडे उमेदवाराचा फोटो, चिन्ह आणि मतदाराचे नाव असलेल्या चिठ्ठ्या आढळून आल्या.हवालदार काटवटे यांनी याबाबतची माहिती सहायक पोलिस निरीक्षक चौधरी यांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आरोपींकडून दहा चिठ्ठ्या जप्त केल्या.दरम्यान, उंडाळे येथेच दुसऱ्या मतदान केंद्रावर मंडल अधिकारी विलास थोरात हे ड्युटीवर असताना त्या ठिकाणीही संजय साहेबराव कोळी (रा. उंडाळे) हा उमेदवाराच्या प्रचारार्थ चिठ्ठ्या वाटत असल्याचे थोरात यांच्या निदर्शनास आले.थोरात यांनी बीएलए टेबलावर जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी उमेदवाराचा फोटो, नाव, चिन्ह आणि मतदारांची नावे असलेल्या चिठ्ठ्या दिसल्या. एकूण तेरा चिठ्ठ्या त्या ठिकाणी आढळून आल्या. मंडल अधिकारी थोरात यांनी त्या चिठ्ठ्या जप्त करून याबाबत कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फौजदार राजेंद्र पाटोळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस