शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 14:19 IST

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत्यल्प प्रमाणात हा विसर्ग आहे.

ठळक मुद्दे१४६ टीएमसीवर पाणी : जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा यंदा भरण्यास उशीर; तीन धरणांमधून विसर्ग सुरू

सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत्यल्प प्रमाणात हा विसर्ग आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच महिने पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तर गेल्यावर्षी सततच्या व धुवांधार पावसामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील प्रमुख धरणे फुल्ल झाली होती. त्यानंतरही पाऊस होत राहिल्याने पिकांसाठी पाण्याची मोठी मागणी झाली नाही.

परिणामी यावर्षी उन्हाळ्यातही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा टिकून राहिला होता. त्यातच यावर्षी जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरूवात झाली.

काही दिवस धुवांधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला.

परिणामी धरणे भरणार का? अशी चिंताही निर्माण झाली होती. आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरूवात झाली. पश्चिम भागात तर काही दिवस धुवांधार पाऊस पडला.

यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता.जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्य:स्थितीत या धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

म्हणजे धरणे भरण्यासाठी फक्त २ टीएमसी पाण्याची आवश्यता आहे. त्यातच या धरण परिसरातही सध्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याची हळू हळू आवक होत असून धरणे भरल्यातच जमा आहेत.दरम्यान, सद्य:स्थितीत धोम धरणातून बोगद्याद्वारे १५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कण्हेरच्या पॉवर हाऊसमधून नदीला ५७४ तर उरमोडी धरणातून नदीला २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणातही १.१५ टीएमसी पाणीसाठा झाला असून १०० टक्के भरले आहे. सध्या या धरणातून १५६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे              यावर्षी       टक्केवारी    एकूण क्षमता

  • धोम           १३.२८            ९८.३८         १३.५०
  • कण्हेर         ९.९२             ९८.१७         १०.१०
  • कोयना     १०३.९६            ९८.७७       १०५.२५
  • बलकवडी    ३.९०               ९५.५९          ४.०८
  • उरमोडी       ९.८५                ९८.८८         ९.९६
  • तारळी         ५.८३               ९९.६४          ५.८५
टॅग्स :RainपाऊसDamधरणSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण