शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

साताऱ्यातील १५ एटीएम सेंटरमधून २४ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 10:01 AM

स्टेट बँकेनेही सिस्टिमला नोंद नसल्याने संशयितांना काही रक्कम परत केली होती. मात्र, तोच प्रकार वारंवार घडू लागल्याने स्टेट बँकेच्या अधिका-यांना संशय आला. त्यांनी एटीम मशीन मधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मात्र, तोपर्यंत बरीच रक्कम

ठळक मुद्देअज्ञात चारजणांवर गुन्हा : स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची तक्रार

सातारा : शहरातील स्टेट बँकेच्या तब्बल १५ एटीममशीनमध्ये तांत्रीक बिघाड करून तब्बल २४ लाख ८१ हजार ५०० रुपयांची रोकड हडप केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी अज्ञात चारजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अज्ञात चारजणांनी २६ जानेवारी ते २ मार्च दरम्यान वेळोवेळी त्यांच्या बँक खात्याच्या एटीएममधून २४ लाख ८१ हजार ५०० रुपये काढले. पैसे काढताना संशयितांनी एटीएम मशीनच्या कॅश शटरला हाताने उचलून धरून त्यात तांत्रीक बिघाड केल्याने रक्कम निघाली. मात्र, ती बँकेच्या सिस्टिमला नोंदली गेली नाही. परिणामी संशयितांनी आमचे पैसे निघाले नाहीत, असे सांगत त्यांच्या बँकेमार्फत पैसे रिफंड करण्यासाठी स्टेट बँकेकडे तक्रार केली. स्टेट बँकेनेही सिस्टिमला नोंद नसल्याने संशयितांना काही रक्कम परत केली होती. मात्र, तोच प्रकार वारंवार घडू लागल्याने स्टेट बँकेच्या अधिका-यांना संशय आला. त्यांनी एटीम मशीन मधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मात्र, तोपर्यंत बरीच रक्कम बँकेच्या खात्यातून हडप झाली होती.

याप्रकरणी स्टेट बँकेचे शाखा व्यव्यस्थापक संजय तुकाराम गव्हाणे (रा. गोलबागेजवळ, राजवाडा,सातारा) यांनी अज्ञात चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक तपास करत आहेत.या एटीएम मशीनमधील रोकड गायब..सातारा शहरात असलेल्या स्टेट बँकेच्या अहिरे कॉलनी येथील दोन, बारावकरनगर येथील दोन, एमआयडीसीतील एक, समर्थ मंदिर येथील दोन, दुर्गापेठेतील एक, सदरबझार येथील एक, नगरपालीकेजवळील एक, गोडोली येथील दोन, शाहूनगर येथील दोन, शाहूपुरी येथील एक अशा एकूण पंधरा एटीम मशीनमधून ही २४ लाखांची रोकड काढली गेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरThiefचोरatmएटीएम