लिंब जिल्हा परिषद गटात सात कोटींची विकासकामे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:44+5:302021-06-22T04:25:44+5:30
किडगाव : लिंब जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व नियोजन समिती फंडातून ...

लिंब जिल्हा परिषद गटात सात कोटींची विकासकामे मंजूर
किडगाव : लिंब जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व नियोजन समिती फंडातून सुमारे सात कोटी रुपयांचा निधी आजपर्यंत मंजूर करण्यात आला आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम यांनी दिली.
कदम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कामठी तर्फे सातारा येथील बंधारा दुरुस्ती व बांधकाम, दलितवस्तीमध्ये रस्ते काँक्रिटीकरण, हायमास्ट लॅम्प, साकव पूल, वाचनालय व अंगणवाडी इमारत, मानेवाडी रस्ता, वेळे येथील बंधारा, बंदिस्त गटर, रस्ते काँक्रिटीकरण, स्मशानभूमी सुधार, शाळा दुरुस्ती, हायमास्ट लॅम्प, प्रशासकीय इमारत, पाण्याची टाकी. आगुंडेवाडी येथील रस्ते काँक्रिटीकरण शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करण्यात येणार आहे.
अहिरेवाडीतील संरक्षण भिंत व अंगणवाडी इमारत. अंबानी येथील पाण्याची टाकी, जोतीबाचीवाडी येथे स्मशानभूमी शेड, बंधारा, शाळा व अंगणवाडी दुरुस्ती. चोरगेवाडी येथे ग्रामपंचायत इमारत पेवर्स, शाळा खोली, विद्युत पोल व डीपी पिसानी येथे शाळाखोली, विद्युतखांब, कण्हेर येथे रस्ते, ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी दुरुस्ती व वॉटर एटीएम. चिंचणी येथील शाळा दुरुस्ती. आकले येथील बंधारे, गोगावलेवाडी येथील शाळा व अंगणवाडी दुरुस्ती, माळ्याचीवाडी येथील अंगणवाडी इमारत, शाळा दुरुस्ती करण्यात येणार आहे.
नुने येथील स्मशानभूमी व बंधारा दुरुस्ती, इंगळेवाडी येथे रस्ता, गवडी येथील रस्ते काँक्रिटीकरण. सारखळ येथे स्मशानभूमी शेड, बंधारा, दलित वस्तीमधील रस्ता, शेड, हमदाबाज येथील चौक सुधारणा पाणीपुरवठा योजनेस विद्युत डीपी, धावडशी येथे स्मशानभूमी रस्ता शाळा दुरुस्ती, दलितवस्ती रस्ता, विद्युतपोल, बंधारे, पिंपळवाडी येथील शाळा दुरुस्ती करण्यात येणार आहे.
कळंबे येथे सीडी वर्क्स बंधारा दुरुस्ती, किडगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना, स्मशानभूमी सुधार, रस्ता क्रॉँक्रिटीकरण, शाळा दुरुस्ती होणार आहे. नेले स्मशानभूमी शेड, रस्ता, हायमास्ट, शाळा दुरुस्ती, वर्ये येथे ग्रामपंचायत इमारत, शाळा खोली, अंगणवाडी इमारत रस्ता, बंधारा, हायमास्ट पोल, रामनगर येथे शाळा दुरुस्ती, पानमळेवाडी रस्ते व पाणीपुरवठा दुरुस्ती, नागेवाडी येथे शाळा खोली, दलितवस्ती रस्ता, कुशी येथे ग्रामपंचायत इमारत, शाळा खोली, लिंब येथे सभामंडप, रस्ते काँक्रिटीकरण, शाळा दुरुस्ती, पशुवैद्यकीय इमारत, कोटेश्वर मंदिरापुढील घाट व पायऱ्या बांधकाम करण्यात येणार आहे. घाटाईदेवी मंदिर परिसर कॉंक्रिटीकरण हायमस्ट लॅम्प या कामाला मंजुरी मिळाली आहे.