शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांनंतरही नागरी सुविधांचा प्रश्न

By admin | Updated: December 1, 2015 00:23 IST

गाढवली ग्रामस्थ : कोयना धरणासाठी केळघरजवळ गावाचे पुनर्वसन

कुडाळ : कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या गाढवली पुनर्वसन येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून चालढकल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणासाठी आपली जागा देऊनदेखील गेल्या पन्नास वर्षांत प्रशासनाने नागरी सुविधांचे प्रश्न न सोडवल्याने आम्हाला विकासापासून अजून किती काळ वंचित ठेवणार आहात? असा सवाल गाढवली पुनर्वसन येथील ग्रामस्थांनी केला आहे.१९६२ मध्ये कोयना धरणाचे काम सुरू झाले होते. त्यावेळी तापोळा विभागातील गाढवली या गावाचे केळघरजवळ कुरळोशी गावच्या पश्चिमेस पुनर्वसन झाले होते. त्यावेळी धरणासाठी गाढवलीच्या ग्रामस्थांनी आपला जमीनजुमला, स्थावर मालमत्ता, घरेदारे यावर पाणी सोडून स्थलांतर केले होते. आज या घटनेला अनेक वर्षे झाली आहेत.ग्रामस्थांच्या या असीम त्यागाची गेल्या पन्नास वर्षांपासून प्रशासनाकडून बोळवण होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुनर्वसित गावाला अठरा नागरी सुविधा देणे बंधनकारक असताना गाढवलीतील प्रश्नांबाबत मात्र प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. येथे पुनर्वसनाच्या अठरा नागरी सुविधांतर्गत संपूर्ण गावातील अंतर्गत रस्ते, टप्प्याटप्प्यांवर तीन मीटर उंचीच्या आरसीसी संरक्षण भिंती, स्मशानभूमी शेड बांधकाम, अंतर्गत गटारे, पिण्याच्या पाण्याची सोय ही कामे प्राधान्यक्रमाने करावीत, याबाबतचे लेखी पत्रही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कृष्णा खोरेला दिले होते. आमदारांच्या लेखी पत्राचीही दखल घेतली जात नसल्याचे गाढवलीचे उपसरपंच बबनराव शिंदे यांनी सांगितले. गाढवली पुनर्वसन येथे ८५ लाखांची विकासकामे प्रस्तावित असताना कृष्णा खोरेकडून वेळकाढूपणा केला जात असल्याबाबत गाढवलीच्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासकामांची पाहणी, सर्वेक्षण तसेच अंदाजपत्रक तयार करून कृष्णा खोरेचे अधिकारी गावातून गेले आहेत. मात्र, सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामे मार्गी न लागल्याने नागरी सुविधा कधी मिळणार, या प्रतीक्षेत गाढवलीचे नागरिक आहेत. (प्रतिनिधी)