सातारा जिल्हा हिरवागारसाठी ४० लाख रोपे! २३ लाख लागवडीचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:23 IST2018-06-15T21:23:57+5:302018-06-15T21:23:57+5:30

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्'ाला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत.

 40 lakh plants for greening of Satara district! 23 million cultivation targets | सातारा जिल्हा हिरवागारसाठी ४० लाख रोपे! २३ लाख लागवडीचे टार्गेट

सातारा जिल्हा हिरवागारसाठी ४० लाख रोपे! २३ लाख लागवडीचे टार्गेट

ठळक मुद्देदरवर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक काम; उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून जगविली झाडे

नितीन काळेल ।

सातारा : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सातारा जिल्'ाला २३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सद्य:स्थितीत वनविभागाकडे २५ लाख व इतर विभागांची मिळून सुमारे ४० लाख झाडे तयार आहेत. त्यामुळे यावर्षीही जिल्'ात उद्दिष्टापेक्षा अधिक काम होणार आहे. तर दुसरीकडे वन विभागाकडील झाडे जगण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असून, उन्हाळ्यात टँकरने झाडांना पाणी घालण्यात आले होते.

राज्य शासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. पहिल्या २०१७ यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यामध्ये सातारा जिल्'ाला ७ लाख ६३ हजार वृक्ष लागवडीचे तर वन विभागाला ४ लाख ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात वनविभागाने ५ लाख ३९ हजार झाडे लावली. यावर्षी जिल्'ात २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, वन विभागाला त्यापैकी १३ लाख २५ झाडे लावायची आहेत. असे असलेतरी प्रत्यक्षात वनविभागाने १६ लाख झाडांचे नियोजन केले आहे.

१ ते ३१ जुलै असा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम असून, सद्य:स्थितीत वन विभागाकडे सध्या २५ लाख रोपे तयार आहेत. तर सामाजिक वनीकरण विभाग व कृषी विभागाकडेही रोपे तयार असून, हा आकडा ४० लाखांवर जाणारा आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही जिल्'ात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणार आहे. त्यादृष्टीने वनविभाग व इतर विभागांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

२८ नर्सरीच्या ठिकाणी रोप निर्मिती...
वनविभागाच्या जिल्'ात २८ नर्सरी आहेत. त्यामध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत. लिंब, शिसव, बाभूळ, खैर, कवठ, जांभूळ, आपटा, उंबर, गुलमोहर, चाफा, फणस, चिंच, गूळभेंडी, काशीद, हिवर, सीताफळ, वड, पिंपळ आदी रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.

 


पाच लाखांवर रोपे जगली...
गेल्यावर्षी वन विभागाने त्यांच्या हद्दीत ५ लाख ३९ हजार रोपे लावली होती. त्यामधील ५ लाख २० हजारांवर रोपे आॅक्टोबरअखेर जगली होती. तर उन्हाळ्यात आवश्यक त्या ठिकाणच्या रोपांना पाणी देण्यात येऊन ती जगविण्यात आली. त्यामुळे गेल्यावर्षी लावण्यात आलेली ९० टक्क्यांच्यावर रोपे वनविभागाने जगविली आहेत.

जुलैपासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यावर्षी वन विभागाच्या १०७ ठिकाणावर ही झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी खड्डेही खोदण्यात आले आहेत. विविध संस्था, शाळांचा या लागवडीत सहभाग घेणार आहे.
- अनिल अंजनकर,उपवनसंरक्षक वनविभाग

 

Web Title:  40 lakh plants for greening of Satara district! 23 million cultivation targets