वाई पालिकेच्या गोडाऊनमधून ३३ एलईडी बल्ब चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:50 IST2020-08-20T16:50:01+5:302020-08-20T16:50:49+5:30

वाई पालिकेच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ३३ एलईडी बल्बसह ३८ हजारांचे विद्यूत उपकरणाचे साहित्य चोरून नेल्याची दि. १५ रोजी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे वाई पालिकेत प्रचंड खळबळ उडालीय.

33 LED bulbs stolen from Y municipality godown | वाई पालिकेच्या गोडाऊनमधून ३३ एलईडी बल्ब चोरीस

वाई पालिकेच्या गोडाऊनमधून ३३ एलईडी बल्ब चोरीस

ठळक मुद्देवाई पालिकेच्या गोडाऊनमधून ३३ एलईडी बल्ब चोरीसवाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाई : वाई पालिकेच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ३३ एलईडी बल्बसह ३८ हजारांचे विद्यूत उपकरणाचे साहित्य चोरून नेल्याची दि. १५ रोजी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे वाई पालिकेत प्रचंड खळबळ उडालीय.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, वाई येथील गणपतीआळी येथे पालिकेचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, दि. १४ आॅगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कर्मचारी साहित्य घेण्यासाठी गेले असता चोरटयांनी गोडाऊनची खडकी तोडून इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यामध्ये ३३ एलईडी बल्ब, सर्व्हिस वायरचे पाच बंडल, लोखंडी क्लमस, रेडूसर आरमसचे पन्नास नग असे ३८ हजार २३३ रुपयायांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी अज्ञातावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: 33 LED bulbs stolen from Y municipality godown