शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाचगणीतील हाॅटेलमध्ये नाचविल्या बारबाला; १२ बारबालांसह ३२ जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:32 IST

पोलिसांचा छापा; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा/पाचगणी : पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील कासवंड परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून १२ बारबाला तसेच २० गिऱ्हाइकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ध्वनिक्षेपक यंत्रणा, माईक, मोबाइल, कार, असा सुमारे २५ लाख ४५ हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला.पाचगणीसारख्या जागतिक पर्यटनस्थळाच्या ठिकाणी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली बारबाला महिला आणल्या जातात. त्यांना संगीताच्या तालावर कमी कपड्यात बीभत्स हावभाव व अंगविक्षेप करून नृत्य करण्यास भाग पाडले जाते, याची माहिती पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवारी रात्री त्यांच्याकडील पोलिसांच्या खास पथकाला घेऊन भिलार, कासवंड हद्दीतील हॉटेल हिराबाग (बिलिव्ह) वर छापा टाकला. यावेळी तेथे १२ बारबाला आळीपाळीने येऊन उत्तान कपड्यात २० गिऱ्हाइकांसमोर नृत्य करत होत्या. तसेच गिऱ्हाइकांशी त्या लगट करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. तर काही जण बारबालांसमवेत नृत्य करत होते. या १२ बारबालांसह हाॅटेल मालक व इतर २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच साऊंड सिस्टीम, माईक यासह अन्य साहित्य हाॅटेलमधून जप्त करण्यात आले. संशयितांवर महाराष्ट्र हाॅटेल आणि मद्यपान कक्ष (बाररूम)मधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध तसेच दारूबंदी अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, सहायक फौजदार रवींद्र कदम, हवालदार श्रीकांत कांबळे, कैलास रसाळ, विनोद पवार, सचिन बोराटे, पोलिस नाईक तानाजी शिंदे, कॉन्स्टेबल उमेश लोखंडे, सुमित मोहिते, रेखा तांबे यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस