कोयनानगर येथे २.५ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद; धरण सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 00:08 IST2024-09-11T00:07:12+5:302024-09-11T00:08:06+5:30
या भुकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचे माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

कोयनानगर येथे २.५ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद; धरण सुरक्षित
कोयनानगर : पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील भुकंपमापन केद्रावर मंगळवारी रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी भुकंपाची नोंद झाली असुन कोयना भुकंपमापन केद्रावरील नोंदीतील भुकंपाची तीव्रता २.५ रिश्टेर स्केल इतकी आहे. हा भूकंपाचा धक्का कोयना परिसरात जाणवला नाही. या भुकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचे माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
मंगळवार दि १० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजुन १४ मिनिटानी कोयना येथील भूकंपमापन केंद्रावर या सौम्य भूकंपाच्या धक्कयाची नोद झाली असून तीव्रता २.५ रिश्टर स्केल इतकी होती. भुकंपाच्या केंद्र बिंदुची खोली ७ किमी इतकी असून भुकंपाचा केंद्रबिदु कोयना धरणापासून ८.८ किमी अंतरावर आहे. हा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत्येला सहा किलोमीटर अंतरावर होता. या भुकंपाचा धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असुन कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाने दिली.