शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात १३ वर्षांच्या मुलीवर कॅफेत अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:37 IST

सातारा : सातारा शहरातील अंधार कोठडीतील कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कॅफेमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ...

सातारा : सातारा शहरातील अंधार कोठडीतील कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कॅफेमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कॅफेवर छापे टाकले. यामध्ये कॅफे मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील सहा महिन्यांपूर्वी शहरातील कॅफेमध्ये तरुण-तरुणींकडून अश्लील चाळे केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. यानंतर कॅफेमधील पडदे व अंधार कोठडी हटविण्यात आल्या होत्या. परंतु पुन्हा कॅफे चालकांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी कॅफेमध्ये अंधार व पडदे लावले.काही दिवसांपूर्वीच हीच संधी साधून शहरातील एका कॅफेमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर एका १७ वर्षांच्या तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून, सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर सातारा शहर पोलिसांनी दि. ६ रोजी दुपारी शहरातील राधिका रस्त्यावरील आर. बी. कॅफेवर छापा टाकला. याठिकाणी एक महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी सापडली. या दोघांना अश्लील कृत्य करण्यास प्रेरणा दिल्याचा ठपका ठेवत कॅफे चालक रोहित गजानन सुतार (वय २५, रा. किन्हई, ता. कोरेगाव) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत हवालदार संतोष घाडगे यांनी फिर्याद दिली आहे. तसेच याच परिसरातील ब्लॅक इन कॅफेवरही पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी तरुण, तरुणी आढळून आले. कॅफे चालक सुशांत जितीन धुमाळ (वय २६, रा. सोनके, ता. कोरेगाव) याच्यासह संबंधित तरुण, तरुणीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.बैठक व्यवस्था सीसीटीव्हीपासून दूर..छापा टाकण्यात आलेल्या कॅफेमध्ये बैठक व्यवस्था सीसीटीव्हीपासून दूर ठेवली होती. अंधार करून जोडप्यांना अश्लील कृत्य करण्यास प्रवृत्त केले जात होते. नोंदणी रजिस्टर न ठेवता कॅफेत येणाऱ्यांना प्रवेश दिला जात होता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस