शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Satara: कऱ्हाडच्या 'शिवशंकर' पतसंस्थेत १३ कोटींचा अपहार झाल्याचा ठपका, लेखा परिक्षकांनी शहर पोलिसांना दिला अहवाल 

By प्रमोद सुकरे | Updated: March 14, 2024 19:11 IST

पोलिसांची कायदेशीर कार्यवाही सुरू 

प्रमोद सुकरेकऱ्हाड : येथील बहुचर्चीत शिवशंकर नागरी पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजारांचा अपहार झाल्याचा अहवाल गुरुवारी  विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी शहर पोलिसांना दिला आहे. त्यानुसार त्या सगळ्याची पोलिस चौकशी सुरू झाली आङे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी त्याला दुजोरा दिला आहे.ठेव नसताना ठेव तारण कर्जाचे वाटपासहीत विनातारण कर्ज वितरण, कागदपत्रांचीही पूर्तता न करताच कर्ज वितरणासारखे आणि खोट्या सह्या, बनावट कागदपत्रांच्या आधारावर अपहार केल्याचे त्यात म्हटले आहे. त्या सगळ्याची पोलिस चौकसी होणार आहे. त्यामुळे संस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार ७२२ रूपयांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. ठेवीदारांनाही पोलिस ठाण्यात धाव घेत त्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याबाबतचे निवेदनही पोलिसांना ठेवीदारांनी दिले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवशंकर पतसंस्थेत एक एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षम झाले. ते लेखा परिक्षण विसेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी केले आहे. त्यानुसार त्यांनी अहवाल दिला आहे. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार अपहार झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. त्यानुसार संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी सुचवले आहे.त्याशिवाय उपनिबंधक जनार्दन शिंदे यांनीही विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी सादर केलेल्या अहवालत पतसंस्थेत १३ कोटी नऊ लाख ९६ हजार अपहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्या आर्थिक नुकसानीस जबाबादर असणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्याचेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

 कर्ज वितरण करताना तारण न घेणे, अपूर्ण कागदपत्रे, त्यासह व्यवस्थापक व सेवकांच्या मदतीने तयार केलेल्या खोट्या व बनावट कागदपत्रे वापरली आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या हीतास बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्वासघात, फसवमूक करून संचालक मंडळाने हेतु पुरस्सर नियमबाह्य व पदाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने तब्बल ११ कोटी ५३ लाख १६ हजार ९१५ रूपयांचा अपहार केल्याचा ठपका त्यानीही ठेवला आहे.

 त्यासह ठेव नसताना ठेव तारणाच्या नावाखाली तब्बल एक कोटी ५६ लाख ७९ हजारांचे कर्जही वितरण केल्याचे त्यांच्या अहवाला नमूद आहे. पोलिसांनी ते अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार त्याची त्या सगळ्याची पोलिस चौकशी सुरू झाली आहे, असे पोलिस निरिक्षक पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगतिले.

ठेवीदारांचा पोलिसांना गराडा

शिवशंकर पतसंस्सथेच्या ठेवीदार कृती समितीने पोलिस ठाण्यात आज भेटून निवेदन देत त्यांना कारवाईची विनंती केली. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कागदपत्रे न तपासता, संस्थेबद्दल कोणतेही कात्री किंवा दोष दुरुस्ती अहवालात दाखवलेले नाही. संचालक मंडळ, कर्मचारी व लेखापरीक्षक यांनी परस्पर संगनमताने ठेवीदारांची फसवणूक करून २८ कोटींची आर्थिक लूट केली आहे. त्यांच्यावर ठेवीदारांचा व शासन फसवणूकीबद्ल व एमपी आयडीनुसार गुन्हा नोंद दाखल करावा. संर्व संशयीत फरार होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्राप्त अहवालानुसार दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करावी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस