शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

सातारा जिल्ह्यात मोठी धरणे भरू लागली; नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:42 IST

सहा प्रकल्पात १२३ टीएमसी पाणी : कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर अन् उरमोडीत ८३ टक्के साठा 

सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील धरणे भरू लागली आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या सहा मोठ्या प्रकल्पात १२३ टीएमसीवर पाणीसाठा झाला होता. ही धरणे ८३ टक्के भरली होती. तर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाची उघडझाप सुरू झाली; पण मागील संपूर्ण आठवडा पावसाने गाजविला. पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत होता. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह कांदाटी खोऱ्यातील पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. हा पाऊस मोठ्या धरणक्षेत्रातही सुरू होता. यामुळे धरणांतही मोठ्या प्रमाणात साठा वाढला. परिणामी धरणांमधून विसर्ग वाढवावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी प्रमुख मोठे सहा प्रकल्प ८३ टक्के भरलेले आहेत.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४७, नवजा ४१ आणि महाबळेश्वरला ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणात ३८ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८५.४४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ८१.१८ धरण पाणीसाठ्याची टक्केवारी होती. तर धरणाचा पायथा वीजगृह २ हजार १०० आणि धरणाच्या सहा वक्रदरवाजातून २९ हजार ६४६ असा एकूण ३१ हजार ७४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.

महाबळेश्वरला ३३०२ मिलिमीटरची नोंद..जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पाऊस पडतो. यंदा एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे २ हजार ९३५ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजा येथे ३ हजार १८२ आणि महाबळेश्वरमध्ये ३ हजार ३०२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातारा शहरातही पावसाची उघडझाप कायम आहे.

प्रमुख धरणातून ४८ हजार क्युसेक विसर्ग..पश्चिम भागात पाऊस असल्याने कोयनासह प्रमुख धरणातून विसर्ग सुरूच आहे. सकाळच्या सुमारास धोम धरणातून ७ हजार १३१, बलकवडी ७४०, कण्हेर ४ हजार २९०, उरमोडी ५०० आणि तारळी धरणातून ३ हजार ५४९ क्युसेकने पाणी सोडले जात होते. त्यामुळे या सहा धरणातून एकूण ४७ हजार ९६२ क्युसेक पाणी विसर्ग होता. परिणामी वेण्णा, कोयना, उरमोडी तसेच कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, सध्या काही भागात पाऊस कमी झाल्याने विसर्गात घट होणार आहे.