शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

उंब्रजमध्ये दहा लाखांचा खुनी दरोडा-पाच ठिकाणी धुमाकूळ,उशी दाबून वृध्देला ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 8:41 PM

उंब्रज : उंब्रज परिसरातील पाच ठिकाणी जवळपास दहा लाखांपेक्षाही जास्त रकमेचा दरोडा टाकून टोळीने एका वृद्ध महिलेचा खूनही केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे कºहाड तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, सीसीटीव्हीतील फुटेजवरून दरोडेखोरांच्या मागावर विविध पोलिस पथके रवाना झाली आहेत.याबात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री उंब्रजमध्ये चोरट्यांनी ...

उंब्रज : उंब्रज परिसरातील पाच ठिकाणी जवळपास दहा लाखांपेक्षाही जास्त रकमेचा दरोडा टाकून टोळीने एका वृद्ध महिलेचा खूनही केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे कºहाड तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली असून, सीसीटीव्हीतील फुटेजवरून दरोडेखोरांच्या मागावर विविध पोलिस पथके रवाना झाली आहेत.

याबात घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री उंब्रजमध्ये चोरट्यांनी पाच ठिकाणी दरोडा टाकला. यामध्ये बाजारपेठतील उद्योजक मुल्ला कुटुंबीयांच्या बंगल्यात मागील बाजूने दरोडेखोर आत शिरले होते. चोरी करताना जैनुबी करीम मुल्ला (वय ८६) या जाग्या झाल्याने दरोडेखोरांनी तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. याठिकाणी ३० तोळे सोने लुटून दरोडेखोर पुढे पांडुरंग कुंभार यांच्या घरी गेले. या ठिकाणी सुमारे पाच तोळे सोन्यांचे दागिने तसेच दहा हजार रुपये रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली. त्याचबरोबर अन्य तीन ठिकाणीही या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दरोडेखोरांनी राष्ट्रीय महामार्गावरील शिवडे गावालगत असलेल्या इडली कामत हॉटेलमध्येही पहाटेच्या सुमारास चोरी केली.

ही घटना समजल्यानंतर रात्रीच्या सुमारासच पोलिस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. तर सकाळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथक आले होते. त्यांच्याकडून तपास सुरू होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.

‘पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून लवकरात लवकर दरोडेखोरांपर्यंत आम्ही पोहोचू,’ अशी ग्वाही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ही टोळी सातारा जिल्'ाबाहेरील असून, प्रत्येकजण किमान सहा फुटांपेक्षा अधिक उंचीचा असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.दरोड्यासाठी टेम्पोचा वापर...उंब्रजमध्ये धुमाकूळ घालणाºया या दरोडेखोरांनी चक्क ४०७ हा टेम्पो वापरल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, उंब्रजमधील नागरिक जोरजोरात आरडाओरडा करीत असतानाही कुणालाही न घाबरता अत्यंत शांत डोक्याने ही टोळी हातात कुºहाडी अन् कोयते घेऊन दरोडे टाकत होती. उंब्रजमध्ये पाच ठिकाणी दरोडे पडल्यानंतर बुधवारी सकाळी घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती.शिवडे, ता. कºहाड येथील हॉटेलातील सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद झाले आहेत.  

 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाSatara areaसातारा परिसर