शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: जादा परताव्याचे आमिष; अभियंत्याची १ कोटीची फसवणूक, एकाविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:40 IST

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा.लि., या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो, असे ...

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा.लि., या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो, असे आमिष दाखवत अभियंत्याची एक कोटी १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध पुणे येथील सिंहगड रोड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीचे लक्ष्मीकांत नथुराम त्रिवेदी (रा. फ्लॅट नंबर ३०१, भारत श्री एरंडवणे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकीय संचालकांचे नाव आहे.आप्पासो दत्तात्रय शेडगे (वय ५६) हे सध्या पुणे येथील मोहिते टाऊनशिप, आनंदनगर, सिंहगड रोड याठिकाणी वास्तव्यास आहेत. ते मूळ हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली येथील रहिवासी आहेत. एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये डिझायनर कन्सल्टंट म्हणून ते कार्यरत होते. एका मित्राने लक्ष्मीकांत त्रिवेदी यांची ओळख करून दिल्यानंतर आप्पासो शेडगे व लक्ष्मीकांत त्रिवेदी यांच्या गाठीभेटी होत राहिल्या. त्रिवेदी यांनी आप्पासो शेडगे यांना आपल्या धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा. लि., या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करा, बँकेपेक्षा जास्त प्रमाणात नफा मिळवून देतो तसेच गुंतवणुकीच्या रकमेवर तीस टक्के परतावा मिळवून देतो असे सांगितले.त्रिवेदी याच्या आमिषाला बळी पडत आप्पासो शेडगे यांनी चेकद्वारे ८१ लाख रुपये व रोख स्वरुपात २९ लाख ५० हजार रुपये लक्ष्मीकांत त्रिवेदी याला सुपूर्द केले. यामध्ये त्रिवेदी व शेडगे यांच्यामध्ये लेखी करारही झाला. दरम्यान, गुंतवलेली रक्कम व त्यावरील कोणताही परतावा न दिल्याने शेडगे यांनी त्रिवेदी यांना वारंवार विचारणा केली. याबाबत त्रिवेदी टाळाटाळ करीत होते.तसेच आप्पासो शेडगे यांना त्रिवेदी यांना गुंतवणुकीपोटी दिलेले चेक वटलेच नाहीत. त्यामुळे शेडगे यांनी त्रिवेदीकडे गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितली. त्यावेळी त्रिवेदी याने शेडगे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच शेडगे यांनी त्रिवेदी यांच्याविरुद्ध तक्रार केली. याबाबत सिंहगड रोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस