शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

जातीच्या दाखल्याबद्दल आक्षेप; निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 20:36 IST

ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्यात आली. राष्ट्रवादीचे रणजित पाटील यांच्यासह काही नेत्यांनी तात्काळ वकिलांना बोलावून त्याबाबत मार्गदर्शन घेतले.

ठळक मुद्दे सांगली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अर्जाविरोधात न्यायालयात जाणार-: विक्रम सावंत, अविनाश पाटील

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित होते. यासाठी भाजपकडून प्राजक्ता कोरे यांनी अर्ज दाखल केला होता. कोरे यांचा जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी आमची भूमिका जाणून घेतली नाही. याबद्दल वकिलामार्फत लगेचच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अध्यक्ष निवडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्यात आली. राष्ट्रवादीचे रणजित पाटील यांच्यासह काही नेत्यांनी तात्काळ वकिलांना बोलावून त्याबाबत मार्गदर्शन घेतले. कोरे यांच्या अर्जाविरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी नाईक, काँग्रेसच्या कलावती गौरगौंड, जितेंद्र पाटील, विशाल चौगुले यांनी हरकत घेऊनही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमची बाजू जाणून घेतली नाही. आम्हाला वकिलामार्फत बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. आमचे वकील अ‍ॅड्. अमित शिंदे यांनी बाजू मांडण्यासाठी सदस्यांकडून सर्व कागदपत्रे घेतली होती. कर्नाटकातील ओबीसीचा दाखला महाराष्ट्रात चालत नाही, अशी भूमिका होती. तरीही अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष करुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अन्याय केला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. उच्च न्यायालयातही लगेचच याचिका दाखल करणार असून निकाल आमच्या बाजूनेच लागेल.चौकटडोंगरेंच्या प्रतिज्ञापत्रात चुकाउपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या प्रतिज्ञापत्रात मुलांचा उल्लेख नाही. त्यांच्या पत्नीही सदस्या आहेत, त्यांच्या प्रतिज्ञापत्रात मात्र दोन मुलांचा उल्लेख आहे. याबाबत हरकत घेण्यात आली. भाजपकडून त्यांचा एकमेव अर्ज असल्याने हरकत घेऊन कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत करूनही, त्यांची सत्तेची गणिते फोल ठरली.

  • बार कौन्सिलकडे तक्रार

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीवर कागदपत्रे न घेता व वकिलांना सुनावणीसाठी संधी न देता बेकायदेशीरपणे छाननी प्रक्रिया राबविली, असा आरोप अ‍ॅड्. अमित शिंदे यांनी केला. अधिकाºयांच्या या भूमिकेविरोधात बार कौन्सिलकडे तक्रार करणार आहे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगलीPresidentराष्ट्राध्यक्ष