शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा कडाका वाढला, सांगलीत उद्यापासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात

By अशोक डोंबाळे | Updated: March 7, 2023 16:49 IST

शिक्षक संघटनांच्या मागणीला यश

सांगली : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शिक्षक भारती, शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदशाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी जिल्हा परिषद शाळा बुधवार दि. ८ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेतला आहे.उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई, वीज कपात या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शाळेतील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी शिक्षक संघ, शिक्षक भारती उर्दू संघटना, शिक्षक भारती आणि जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी आणि शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानुसार नगरपालिका, जिल्हा परिषद शाळा दि. ८ मार्चपासून सकाळी ७.२० वाजता सुरू होणार आहेत. मधली सुटी सकाळी साडे नऊ ते दहा असणार आहे. त्यानंतर दुपारी साडे अकरा वाजता शाळा सुटणार आहे. सकाळी पहिले दहा मिनिटे हे परिपाठला असणार आहेत.चाचणी परीक्षा होईल; पण रविवारी नाहीपहिली, दुसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेमार्फत गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा रविवारी घेऊ नये, अशी शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार रविवारचा दिवस वगळून शाळेच्या वेळेतच परीक्षा घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी घेतला आहे.

टॅग्स :SangliसांगलीweatherहवामानSchoolशाळाzpजिल्हा परिषद