शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 12:17 IST

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे.

- श्रीनिवास नागे सांगली - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे. त्यातून जिल्ह्यातील आठपैकी चार ते पाच मतदारसंघांतील समीकरणे बदलणार आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांवर मते घेतली. त्यामुळे येथील सहा विधानसभा मतदारसंघांत आघाडी आणि युतीला या नव्या विरोधकाची धास्ती वाटू लागली आहे. सांगलीत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ पुन्हा मैदानात असतील. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी डोंगरे यांना ‘वंचित’तर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीकडून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई मदन पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.मिरज राखीव मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. काँग्रेसने ‘वंचित’शी आघाडी केल्यास ही जागा ‘वंचित’ला वा ‘स्वाभिमानी’साठी सोडली जाईल. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांतीलच नाव ‘वंचित’ किंवा ‘स्वाभिमानी’कडून पुढे येऊ शकते.विशाल पाटील व आ. विश्वजित कदम यांची भूमिका सांगली तसेच मिरजेतील काँग्रेसचा उमेदवार निवडण्यात निर्णायक ठरणार आहे.जतमध्ये भाजपचे आ. विलासराव जगताप यांना पक्षांतर्गत विरोध वाढत असून, दुसऱ्या गटाकडून डॉ. रवींद्र आरळी, तम्मणगौडा रवी-पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. काँग्रेसचे विक्रम सावंत पुन्हा तयारीत आहेत. लोकसभेला ‘वंचित’ने येथे दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे माजी आमदार प्रकाश शेंडगे, अशोक बन्नेनवार या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील व अजितराव घोरपडे यांची लढत निश्चित दिसते. खा. संजयकाका पाटील यांचे हे ‘होम ग्राऊंड’ असून, त्यांची ताकद कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. धनगर समाजामुळे येथेही ‘वंचित फॅक्टर’ चालणार आहे.खानापुरात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी भाजप व खासदार गटाशी जुळवून घेतले आहे. पण भाजपमध्ये असलेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. काँग्रेसकडून माजी आमदार सदाशिवराव पाटील तयारीत आहेत. गोपीचंद पडळकर यांचे ‘होम पिच’ असून ते स्वत: लढणार की, कोणाला पाठिंबा देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसकडून आ. विश्वजित कदम व भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यातील सामना वर्षभरापूर्वीच ठरला आहे. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांना तगडी लढत देण्यासाठी राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना कसे थांबवणार, हा प्रश्न आघाडीसमोर आहे. तेथे सम्राट महाडिक यांनी आधीच उमेदवारी जाहीर करून युतीसमोर पेच निर्माण केला आहे.जयंत पाटील यांना शह देणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी भाजपने चाल रचण्यास सुरुवात केली आहे. आ. पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा चंग महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, गौरव नायकवडी येथून इच्छुक आहेत.२०१४ मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय : इस्लामपूर : जयंत पाटील (राष्ट्रवादी) १,१३,०४५. प्रतिस्पर्धी उमेदवार : अभिजित पाटील (अपक्ष) ३७,८५९. फरक : ७५१८६सर्वांत कमी मतांनी विजय : शिराळा : शिवाजीराव नाईक (भाजप) ८५,३६३. प्रतिस्पर्धी उमेदवार : मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) ८१,६९५. फरक : ३६६८एकूण जागा : ८  सध्याचे बलाबलभाजपा - ४, शिवसेना - १, राष्ट्रवादी - २, काँग्रेस - १

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस