शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यात ‘हनी ट्रॅप’मधून तरुणांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी संपर्क साधून नंतर थेट नको त्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची ...

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी संपर्क साधून नंतर थेट नको त्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक प्रकरणे घडत आहेत. महिनाभरात आटपाडीतील २५ हून अधिक तरुण या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून लुटले गेल्याची चर्चा आहे.

सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे फेसबुक आणि व्हॉटस्‌ॲपवर सतत मग्न असणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. या तरुणांना सध्या हनी ट्रॅपमध्ये अडकविले जात आहे. ही फसवणुकीची पद्धत अशी आहे : सुरुवातीला तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. मग मोबाइल नंबर घेतला जातो. नंतर थेट व्हिडिओ कॉल केला जातो. ती तरुणी हिंदीत लडिवाळपणे संभाषण करीत एकेक कपडे उतरविते. तरुणालाही अंगावरील कपडे काढण्याचा आग्रह करते. हे तरुण कसलाही विचार न करता सगळे कपडे उतरवितात. हे सगळे रेकॉर्ड होत असते. नंतर तिकडून फोन येतो की, ‘त्या तरुणीने तुमच्यामुळे आत्महत्या केलीय, तुमचे लोकेशन आम्ही तपासत आहोत. आम्ही अमक्या-तमक्या पोलीस ठाण्यातून बोलत आहोत’ किंवा काही तरुणांना त्याचाच व्हिडिओ पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जात आहे. तरुणांच्या ऐपतीनुसार पैशाची रक्कम ठरली जात आहे.

या प्रकारामुळे अनेक तरुण हादरून गेले आहेत. अनेक जण लुटले गेले आहेत; पण अब्रूच्या भीतीने आतापर्यंत कुणीही आटपाडी पोलीस ठाण्यात गेलेले नाही.

चौकट

पैसेही गेले आणि अब्रूही गेली तर?

फसलेल्या अनेक तरुणांमध्ये भीती आहे. त्यांना पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून भीती घातल्याने नसती झंजट नको म्हणून तरुण सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे भरत आहेत. एका तरुणाने ८० हजार दोन वेळा भरले, तरीही त्याचा पिच्छा सोडला नाही. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांना या प्रकाराला सामोरे जावे लागले. त्यांनी सरळ पालकांना सांगितले.

कोट

तरुणांनी किंवा कुणीही अनोळखी महिलेशी सलगी, मैत्री वाढवू नये. त्यांना कसली वैयक्तिक माहिती देऊ नये. असा प्रकार ज्यांच्या सोबत घडला आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.

- भानुदास निंभोरे,

पोलीस निरीक्षक, आटपाडी