शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: शेतात खांब लावण्याच्या वादातून तरुणाचा खून, सख्ख्या चुलतभावांसह चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:14 IST

सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे शेतात खांब का लावतोस म्हणून सत्यजित विकास कांबळे (वय २२) याच्यावर सख्ख्या चुलतभावांसह ...

सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे शेतात खांब का लावतोस म्हणून सत्यजित विकास कांबळे (वय २२) याच्यावर सख्ख्या चुलतभावांसह पाचजणांनी कोयत्याने, काठीने वार करून खून केल्याचा प्रकार घडला. संशयित शुभम शैलेश कांबळे (२४), सोमेश शैलेश कांबळे (१९), स्वराज ऊर्फ कुणाल बाळासाहेब कांबळे (२१, रा. पाण्याच्या टाकीजवळ, कर्नाळ), हणमंत दिगंबर गायकवाड (१८, रा. समर्थ कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या चौघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तर एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले.कर्नाळ येथील विकास बाबुराव कांबळे (५६) हे दि. १८ रोजी सायंकाळी त्यांच्या कर्नाळ ते डिग्रज रस्त्यावरील शेतजमिनीत हद्दीचे खांब लावत होते. त्यांचा मुलगा सत्यजित हा सोबत होता. त्यावेळी संशयित पाचजण तेथे आले. त्यांच्या हातात कोयता, काठी होती. त्यांनी सत्यजितला ‘तू व तुझे कुटुंब शेतात हद्द कायम करण्यासाठी खांब का लावताय’ अशी विचारणा केली. त्यावर वाद सुरू झाला तेव्हा शुभम कांबळे याने हातातील कोयत्याने सत्यजित याच्या डोक्यात पाठीमागे दोनवेळा वार केला.तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून कोयत्याने पुन्हा वार करत असताना सत्यजित बचावासाठी डोक्यावर दोन्ही हात ठेवून तो बाजूला सरकला. तेवढ्यात स्वराज याने हातातील काठीने त्याच्यावर हल्ला चढवला. तेथे असलेला प्रणव हा जखमी सत्यजितला वाचवण्यासाठी मध्ये पडला तेव्हा सोमेश, स्वराज आणि युवकाने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. सत्यजितचे वडील विकास व नातेवाईकमध्ये पडले असता सोमेश याने दगड फेकून मारहाण करत घटनास्थळावरून पलायन केले.जखमी सत्यजितला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. वडील विकास यांनी सांगली ग्रामीणमध्ये खुनी हल्ल्याबद्दल गुन्हा दाखल केला. अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना संशयितांना पकडण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण चौगले यांचे पथक संशयितांच्या मागावर होते. त्यांना कर्नाळ ते बुधगाव रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ आणि सांगलीत बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. संशयितांनी हल्ल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावली.

उपचार सुरू असताना मृत्यूसत्यजित कांबळे याच्यावर सख्ख्या चुलतभावासह पाचजणांनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. दि. १९ रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संशयितांवर खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले.

चौघे संशयित तरुणशेतात खांब का लावतोस कारणावरून खून करणारे संशयित अवघे १८ ते २४ वर्षाचे तरुण आहेत. रागातून त्यांनी केलेल्या हल्ल्यात २२ वर्षीय सत्यजितला प्राण गमवावे लागले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस