शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील तासगावात भावजय, पुतण्याकडून तरुणाचा खून; दोघांना अटक, दोघे संशयित फरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 15:20 IST

घरातील वस्तू घेऊन गेल्याच्या रागातून सुरज याला चौघांनी बोलावून घेतले. अन् वार केले

तासगाव : शहरातील इंदिरानगर येथील सुरज उर्फ लल्या दिनकर शिंदे (वय २०) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. भावजय, पुतण्या आणि अन्य दोघे अशा चौघांनी मिळून सुरजवर चाकूने वार केले. याप्रकरणी भावजय जानकी दीपक शिंदे, तिचा मुलगा गोपाळ यांना अटक केली आहे. जतीन (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि अजय जाधव फरारी आहेत. तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, शिंदे कुटुंब इंदिरानगर येथे एकत्र राहते. मात्र, काही दिवसांपासून सुरजचा भावजय व पुतण्याशी वाद सुरू होता. गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान घरातील वस्तू घेऊन गेल्याच्या रागातून सुरज याला चौघांनी बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने पाच वार करून खून करण्यात आला. सुरज उर्फ लल्यावर गळा, खांद्याच्या मागे, डाव्या हाताच्या दंडावर व उजव्या खांद्याजवळ चाकूने वार करण्यात आले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच मृत झाला.खून झाल्याची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी चौघांची नावे निष्पन्न झाली. मृत सुरज याची भावजय आणि पुतण्या यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस