Sangli: चरणमध्ये नदी काठावर तरुणांनी पकडली मगर, बघ्यांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 16:08 IST2023-08-12T15:56:11+5:302023-08-12T16:08:59+5:30
बालेखान डांगे चरण : चरण (ता. शिराळा) येथे नदी काठावरील मळी राणात सहा ते साडे फुट लांब मगर आढळली. ...

Sangli: चरणमध्ये नदी काठावर तरुणांनी पकडली मगर, बघ्यांची मोठी गर्दी
बालेखान डांगे
चरण : चरण (ता. शिराळा) येथे नदी काठावरील मळी राणात सहा ते साडे फुट लांब मगर आढळली. मासेमारीसाठी गेलेल्या काही युवकांनी मगरीस पकडले. मगर पकडल्याची गावात सर्वत्र माहिती होताच नागरिकांनी मगर बघायला मोठी गर्दी केली.
गावातील नाजिम डांगे, फिरोज नायकवड़ी, आलम नायकवड़ी, डॉ. शाहीद कादरी, राजू कुंभार, सचीन बागड़े रोजच मासेमारीसाठी जात असतात. आज शनिवारी सुद्धा सकाळ ते नदी घाटावर गेले होते. यावेळी त्यांना नदी काठावर मळी राणात मगर निदर्शनात आली. त्यांनी धाडसाने त्या मगरीस पकडले.
सहा ते साडे फुट लांब मगरीस दोरीने गुंडाळून गावात आणले. सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणवर व्हायरल झाल्याने मगरीला बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर वन विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देवून ही मगर वनविभागाकडे सपुर्द करण्यात आली. वनअधिकाऱ्यांनी या मगरीस चांदोली धरणात सोडले. सध्या शिराळा पश्चिम परीसरात ठिकठिकाणी मगरीचे दर्शन होत असल्याची चर्चा आहेत.