शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, बेसबॉल बॅटने मारहाण करत युवकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:01 IST

अवघ्या १२ तासांत दोघे संशयित जेरबंद, पोलिसी खाक्या दाखवताच कबुली

इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या वाघवाडी फाट्यावर भर चौकात बुधवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास ३० वर्षीय युवकाचा बेसबॉलच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि डोक्यात मारहाण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून हा प्रकार झाला. पोलिसांनी घटना समजताच गतीने तपास करत अवघ्या १२ तासांत दोघा संशयितांना जेरबंद केले. दोघांनी खुनाची कबुली दिली आहे.सौरभ राजेंद्र केर्लेकर (वय-३०, रा. माळगल्ली, इस्लामपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी अरविंद उर्फ राघू सुभाष साटम (३२,रा. शिवनगर, इस्लामपूर), किरण रामचंद्र सातपुते (३५, मूळ रा.रे ड, ता. शिराळा,सध्या रा. संभुआप्पा मठाजवळ, इस्लामपूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांना उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. गणेश रामचंद्र केर्लेकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुख्य संशयित राघू साटम आणि किरण सातपुते हे दोघे ढाब्यावर काम करतात. तर मृत सौरभ हा राघूचा नातेवाईक असून तो रुग्णवाहिका चालक आणि डीजे ऑपरेटर म्हणून काम करत होता. सौरभचे आपल्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध आहेत यावरून राघू हा त्याच्यावर चिडून होता. त्याचा काटा काढायच्या उद्देशाने त्याला मंगळवारी रात्री उशिरा वाघवाडी फाट्यावरील ओपन जिमशेजारी असणाऱ्या अशोक ढाब्याजवळ बोलावून घेतले. तिथे राघू आणि सौरभ यांची वादावादी झाली. त्यावेळी तिथे असणाऱ्या किरण याने सौरभला धरून ठेवले आणि रागाच्या भरात राघूने लाकडी बॅटचे फटके सौरभच्या तोंडावर आणि डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. मध्यरात्री ही मारहाण झाल्यावर सौरभ हा तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर राघू हा घरी आला तर किरण हा ढाब्यावर झोपी गेला. या कारवाईत सहायक निरीक्षक ज्योती सूर्यवंशी, हवालदार दीपक ठोंबरे, शशिकांत शिंदे, अमोल सावंत, दीपक घस्ते, विशाल पांगे, यशवंत कोळी, सचिन भंडारे, सायबरचे कॅप्टन गुंडेवाड, विवेक साळुंखे यांनी भाग घेतला.पोलिसी खाक्या दाखवताच कबुलीबुधवारी सकाळी खुनाची घटना पोलिसांना समजल्यावर पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी पथकासह तेथे धाव घेत संशयितांची माहिती मिळवत त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली. दरम्यान, सौरभचा खून झाल्याचे समजताच राघू आणि किरण हे दोघे पळून जाण्याचा तयारीत असताना निरीक्षक हारुगडे यांनी पेठनाका परिसरात दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी घटनेची कबुली दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीislampur-acइस्लामपूरPoliceपोलिस