शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार : अतुल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:06 IST

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत.

ठळक मुद्देसांगलीत ‘क्रेडाई’च्या कार्यक्रमास प्रतिसाद

सांगली : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. हे बदल मान्य करावेच लागणार आहेत. त्यामुळे ‘जुनं ते सोनं’ ही म्हण विसरून नव्याने येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी सांगलीत केले.

‘क्रेडाई’ सांगलीच्यावतीने येथील कल्पद्रुम मैदानावर आयोजित ‘ड्रीम होम २०१८’ या वास्तुविषयक प्रदर्शनात ‘सांगली ब्रॅँडिंग, नवोदित उद्योजकांसमोरील आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. के्रडाईचे अध्यक्ष विकास लागू यांच्यासह उपस्थित सांगलीकरांनीही त्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारून मत जाणून घेतले.कुलकर्णी म्हणाले, भारत हा तरुणांचा देश असला तरी, स्वत:ची विचारप्रक्रिया तयार व्हावी, ज्याव्दारे निर्णयक्षमता वाढविणाºया शिक्षणाची खरी गरज आहे. मात्र, ते मिळत नसल्याने तरुण म्हणजे बॉम्बच ठरणार आहेत.

माझ्याकडे काय आहे, यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या लोकांकडे काय आहे, हे पाहण्याची मानसिकता वाढत आहे. संपत्ती मिळविण्यापेक्षा लोकांना दिसणारी संपत्ती असावी, याकडे ओढा वाढत आहे. आपले सुख कशात हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. पूर्वीही बदल होत गेले, मात्र आता त्याचा वेग वाढलेला आहे. पैसा हे साधन असताना, ते आता साध्य बनले आहे.

ते म्हणाले की, आता अनेकांच्या असलेल्या नोकºया, व्यवसाय येत्या २० वर्षांत असणार नाहीत. आजची शिक्षण पध्दतीही भविष्यात निकामी ठरणार आहे. एका व्यक्तीला तीन ते चार व्यवसाय करावे लागणार आहेत. यातून निर्माण होणारा ताण कसा कमी करायचा, हेच त्यावेळचे आव्हान असणार आहे. भविष्याचा वेध घेणाºया नोकरी, व्यवसायाची आज समाजाला सर्वाधिक गरज आहे.यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष रवींद्र खिलारे व पदाधिकारी उपस्थित होते.अभिनय व्यवसाय बेभरवशाचाकुलकर्णी म्हणाले, प्रत्येक व्यवसायात ‘बॅड पॅच’ असतोच. त्यावर मात कशी करायची, हे तंत्र समजणे आवश्यक आहे. बिल्डर्सही आता याविषयी बोलू लागले असले तरी सर्वाधिक बेभरवशाचा व्यवसाय अभिनयाचा आहे. शेतकरी आणि अभिनेता या दोघांचीही स्थिती सारखीच आहे. कष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाचा भाव पडतो, तसाच वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही तर त्याचा अभिनेत्यांना फटका बसतो. 

टॅग्स :SangliसांगलीAtul Kulkarniअतुल कुलकर्णी