शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील महिलेकडे ४० लाख खंडणीची मागणी, कोल्हापूरच्या तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:13 IST

सांगली : सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ करत ४० लाखांची खंडणी मागणारा कोल्हापूरचा व्यावसायिक योगेश वसंत ...

सांगली : सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक करून जातीवाचक शिवीगाळ करत ४० लाखांची खंडणी मागणारा कोल्हापूरचा व्यावसायिक योगेश वसंत पाटील (रा. करवीर वाचनालयाशेजारी, भवानी मंडप, कोल्हापूर) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला विश्रामबाग परिसरात राहते. संशयित योगेश पाटील व पीडितेची नऊ महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याकडून या कालावधीत रोख सात लाख रुपये, सोन्याची अंगठी व डायमंड रिंग घेतली. हा ऐवज परत न देता तिची फसवणूक केली. तसेच पीडितेला पाटील याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळही केली. तिच्या मोबाईलमधील डेटा प्रसारित करण्याची धमकी देऊन ४० लाख रुपये व चार सोन्याच्या बिस्किटांची खंडणी मागितली. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून योगेश पाटील याच्याविरूद्ध ॲट्राॅसिटी, खंडणीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.योगेश पाटील याला बुधवारी पोलिसांनी कोल्हापूरमधून ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई करत न्यायालयात हजर केले. त्यांना एक एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपअधीक्षक विमला एम. पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस