यंदाही हळद साठवणुकीचा प्रश्न
By Admin | Updated: November 11, 2014 23:19 IST2014-11-11T23:04:24+5:302014-11-11T23:19:48+5:30
आवक वाढणार : शेतकऱ्यांकडील पन्नास हजार पोत्यांना कीड-लोकमत विशेष

यंदाही हळद साठवणुकीचा प्रश्न
अंजर अथणीकर - सांगली -गेल्या वर्षभरात येथील मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक सातत्याने होत राहिल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळद साठवणुकीचा प्रश्न भेडसावत आहे. व्यापारी व शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे ५० हजार पोत्यांना डंख (कीड) लागल्याने याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसत आहे.
सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी जगात प्रसिध्द आहे. वर्षाला आठ ते दहा लाख पोत्यांची आवक होत असते. एक पोत्यामध्ये सर्वसाधारण ७५ किलो हळद असते. आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, मराठवाडा व विदर्भातून हळदीची आवक होत असते. ही हळद संपूर्ण भारतभर व आखाती देश, युरोप खंडात पाठविली जाते. सौंदर्यप्रसाधनांबरोबरच औषधांसाठी गुणकारी घटक म्हणून हळद वापरली जाते. सांगली परिसरात हळदीवर प्रक्रिया करणारे चाळीसहून अधिक कारखाने आहेत. त्याचबरोबर मार्केट यार्डमध्ये साठहून अधिक हळद व्यापारी व तितकेच अडत व्यापारी आहेत. सुमारे दोन हजार हमालांची उपजीविका हळदीच्या उलाढालीवर चालते.
गेल्या दोन वर्षांपासून हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही चांगली झाली आहे. यावर्षीही सांगली जिल्हा व कर्नाटकमध्ये हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी आठ लाख पोती हळदीची सांगलीत आवक होण्याची शक्यता आहे. गतवर्षाची साडेचार लाख पोती हळद पेठेत व शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. गोदाम व शीतगृहात जागा नसल्याने यावर्षी व्यापारी व शेतकऱ्यांकडील सुमारे ५० हजार पोत्यांना कीड लागली आहे. कीड लागलेल्या हळदीचा दर क्विंटलला दीड ते दोन हजारांनी घटत आहे.
मोठ्या क्षमतेची गोदामे नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळदीच्या किडीचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी उत्पादन जवळपास वीस टक्क्यांनी वाढल्याने जूनमध्ये हंगाम संपूनही हळदीची आवक सुरूच राहिली आहे. आजही हळदीची आवक चालूच राहिली आहे. नवीन हळदीची आवक जानेवारीपासून चालणार असून, हा हंगाम जानेवारीअखेर चालणार आहे.
अंजर अथणीकर ल्ल सांगली
गेल्या वर्षभरात येथील मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक सातत्याने होत राहिल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना हळद साठवणुकीचा प्रश्न भेडसावत आहे. व्यापारी व शेतकऱ्यांकडे असलेल्या सुमारे ५० हजार पोत्यांना डंख (कीड) लागल्याने याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसत आहे.

हळद व्यापाऱ्यांना गोदामाचा प्रश्न भेडसावत आहे. जूनपर्यंत आम्हाला मोठ्या क्षमतेची हळद गोदामे बांधून मिळावीत, या मागणीसाठी उद्योगमंत्र्यांना चेंबर आॅफ कॉमर्सचे शिष्टमंडळ भेटणार आहे. जगप्रसिध्द असणाऱ्या सांगलीच्या बाजारपेठेला सध्या साठवणुकीचाच प्रश्न भेडसावत आहे. याचा फटका व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनाही बसत आहे.
- मनोहर सारडा, हळद व्यापारी
सांगलीचा हळद बाजार : एक नजर
सांगलीत १९५२ पासून हळदीचे सौदे सुरू आहेत
वर्षाला आठ ते दहा लाख पोत्यांची आवक होते
संपूर्ण देशाबरोबर आखाती देश, युरोप खंडात निर्यात
चाळीसहून अधिक हळद कारखाने
१२० व्यापारी व दोन हजार हमालांची उपजीविका
तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक व सांगली जिल्ह्यातून आवक
हरिपूर (ता. मिरज) येथे दोनशे हळदीचे पेव सुरक्षित
गतवर्षाची साडेचार लाख हळद पोती शिल्लक