उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात; राज्यभर रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:33 IST2022-12-15T18:42:08+5:302022-12-15T19:33:33+5:30
सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं छोटं गाव वड्डी. मिरज शहरालगत असणारे गाव आहे.

उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात; राज्यभर रंगली चर्चा
जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न असणारी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील 'वड्डी' ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाची उमेदवार झाली आहे. या फॉरेन रिटर्न उमेदवाराची राज्यभर चर्चा आहे.
सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं छोटं गाव वड्डी. मिरज शहरालगत असणारे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा उपस्थित करत जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही निवडणुकीत सरपंच पदाची उमेदवार झाली आहे. परदेशा प्रमाणे शुद्ध पिण्याचं पाणी, शिक्षण आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचत का नाहीत? या विचारातून या मुलीने थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
शाळेत शेकड्यांने विद्यार्थी विद्यार्थिनी असताना सगळ्यात मिळून एकच कॉमन टॉयलेट का? विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार ते का नाहीत? परदेशा सारखे शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सेनेटरीपॅडचे व्हेंडिंग मशीन्स आपल्या गावखेड्यात का नाहीत? असे प्रश्न ती विचारते. गावात एवढ्या द्राक्षबागा आहेत. तर मग त्यावर प्रक्रिया करणाऱ्या इंडस्ट्रीज आपल्या परिसरात का नसाव्यात, ही सगळी विकासाची कामे करण्यात किंवा सरकारकडून करून घेण्यात आपले लोकप्रतिनिधी कमी पडतात का? जो प्रगत समाज, देश यशोधराने परदेशात पाहिला तसाच गाव समाज माझ्या गावात बनला पाहिजे हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवली पाहीजे. तसे विकासाचे मॉडेल गावागावात विकसित व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा यशोधरा शिंदे व्यक्त करताना दिसत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"