शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

World Population Day: सांगली जिल्ह्याची लोकसंख्या १४ वर्षात केवळ चार लाखाने वाढली

By अविनाश कोळी | Updated: July 11, 2025 19:31 IST

जिल्ह्यातील आधार कार्डधारकांची संख्या ३२ लाख १६ हजारांवर : लोकसंख्येत मिरज तालुका आघाडीवर

अविनाश कोळीसांगली : देशातील जनगणना चार वर्षांपासून रेंगाळली असली तरी आधार कार्डधारकांच्या संख्येनुसार जिल्ह्याच्या लोकसंख्येचा व वाढीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी होती. २०२५ मध्ये आधार कार्डधारकांची संख्या तब्बल ३२ लाख १६ हजार ९२१ इतकी आहे. त्यामुळे मागील १४ वर्षात लोकसंख्येत सुमारे चार लाखाची वाढ झाल्याचे दिसून येते. मागील पन्नास वर्षातील दशकवाढीचा विचार करता ही वाढ काहीअंशी कमी दिसून येत आहे.देशात २०२१ची जनगणना झाली नाही. तरीही आधार कार्डांच्या संख्येवरून लोकसंख्येचा अंदाज येतो. जन्मलेल्या बाळापासून आता आधार नोंदणी सुरू झाल्याने बहुतांशी प्रमाणात अंदाज खरा ठरू शकतो. जिल्ह्यातील १९७१ ते २०२५ पर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर नागरीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेही दिसून आले आहे. दोन किंवा एका मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मागील ५४ वर्षात सर्वात कमी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या दशकात नोंदली गेली आहे.

जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्यावर्ष  - लोकसंख्या (लाखात)१९७१ - १५.४०१९८१ - १८.३४१९९१ - २२.०९२००१ - २५.८३२०११ - २८.२२

दशकानुसार लोकसंख्या वाढदशक -  वाढलेली लोकसंख्या१९७१ ते ८१ - २.९४ लाख१९८१ ते ९१ - ३.७५ लाख१९९१ ते २००१ - ३.७४ लाख२००१ ते २०११ - २.३९ लाख२०११ ते २०२५ - ३.९४ लाख२०११ ते २०२५ या कालावधीतील वाढीचा आकडा आधार कार्ड संख्येनुसार अंदाजित आहे.

तालुकानिहाय आधार कार्डधारकमिरज - १०,४६,६९७वाळवा - ४,५६,६१३जत  - ३,८०,८५४तासगाव - २,५८,५८९पलूस - २,१३,४५०खानापूर - २,१७,९४१क. महांकाळ - १,७८,६६०आटपाडी - १,७१,०६३कडेगाव - १,०७,११९शिराळा - १,८५,३६३

  • १८ वर्षांवरील महिलांची संख्या ३९.२१ टक्के
  • १८ वर्षांवरील पुरुषांची संख्या ४०.८४ टक्के
  • ५ ते १८ वर्षे वयोगटातील संख्या १७.५६
  • ५ वर्षांखालील संख्या १.२१
  • तृतीयपंथी संख्या ०.९

मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिकतालुकानिहाय आधार कार्डधारकांची संख्या पाहता मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिक दिसते. २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनताही मिरजेच्या शहरी भागात तब्बल ४ हजार २१ प्रतिचौरस किलोमीटर नोंदली होती, तर सर्वात कमी घनता जत तालुक्यात १४७ इतकी नोंदली गेली होती.