शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:25 IST

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पडळकर गटाला दणका

विटा : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यांना कंटाळून पदाचा राजीनामा दिलेल्या विटा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. विटा येथील पंकज दबडे, खानापूरचे संदीप ठोंबरे, मुकेश जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घेतले. त्यामुळे विटा शहरासह खानापूर मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गटाला मोठा धक्का बसला आहे.पडळकर यांचे कट्टर व विश्वासू समर्थक समजले जाणारे भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, विटा शहराध्यक्षा सौ. अर्चना दबडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपचा त्याग केला होता. पक्षांतर्गत कुरघोड्या व गटबाजीमुळे त्यांनी भाजपची साथ सोडल्याचे वृत्त आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करून पंकज दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या या प्रवेशामुळे खानापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खानापूर तालुकाध्यक्षपदी पंकज दबडे, तर सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी संदीप ठोंबरे यांची निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या सहीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर व विश्वासू समर्थक असलेल्या पंकज दबडे, संदीप ठोंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आ. पडळकर गटाला दणका बसला आहे.